अमरावती मनपा निवडणूक रणनितीवर मुख्यमंत्र्यांसोबत गुप्त बैठक, भाजपने जिंकलेल्या 45 जागांवर तडजोड नाही
अमरावती, 28 डिसेंबर (हिं.स.)। महापालिका निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहेत. त्यात भाजप-शिंदे गटाची युती जागावाटपावरून चांगलीच ताणली असताना तसेच भाजपमध्ये उमेदवारांची तुफान गर्दी असताना सीएम देवेंद्र फडणवीसांची अमरावती दौऱ्यात भाजप नेते तुषार भा
अमरावती मनपा निवडणूक रणनितीवर मुख्यमंत्र्यांसोबत गुप्त बैठक  भाजपने जिंकलेल्या 45 जागांवर तडजोड नाही


अमरावती, 28 डिसेंबर (हिं.स.)।

महापालिका निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहेत. त्यात भाजप-शिंदे गटाची युती जागावाटपावरून चांगलीच ताणली असताना तसेच भाजपमध्ये उमेदवारांची तुफान गर्दी असताना सीएम देवेंद्र फडणवीसांची अमरावती दौऱ्यात भाजप नेते तुषार भारतीय यांच्या निवासस्थानी स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांसोबत बंद व्दार बैठक घेतली. भाजपने २०१७ च्या निवडणुकीत जिंकलेल्या ४५ जागांमध्ये कोणतीही तडजोड होणार नाही. उर्वरीत मिळालेल्या आणखी जागा जिंकण्यासाठी सर्वजण कामाला लागा, अशा सूचना या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित पदाधिकाऱ्यांना दिल्याची विश्वसनीय माहिती आहे. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांच्यासह भाजपचे अमरावतीचे प्रभारी आ. संजय कुटे, निवडणूक प्रमुख जयंत डेहनकर, खा. डॉ. अनिल बोंडे, माजी पालकमंत्री प्रवीण पोटे, भाजप प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, आ. राजेश वानखडे, प्रा. दिनेश सूर्यवंशी, माजी महापौर चेतन गावंडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

स्थानिक निवडणूक रणनितीवर चर्चा यावेळी प्रथम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक सर्व सर्व पदाधिकाऱ्यांना महापालिका निवडणुकीसंदर्भात वर्तमान स्थितीची आणि पक्षाच्या रणनितीबाबत चर्चा केली. पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीसंदर्भात केलेली तयारी आणि विशेषतः भाजप आणि शिंदेसेना बाबत जागावाटपावरून सुरु असलेल्या ताणाताणीची सुद्धा यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांना माहिती दिली.

जिंकलेल्या ४५ जागांवर तडजोड नाही

यावेळी मुख्यमंत्र्यांनी पदाधिकाऱ्यांना गेल्या २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपाने ज्या ४५ जागा जिंकल्या होत्या. त्यावर कोणतीही तडजोड होणार नाही, अशी स्पष्ट शब्दात ग्वाही दिली. जिंकलेल्या जागा अपराजित ठेवण्यासाठी, तसेच आणखी अधिकाधिक जागा जिंकण्यासाठी सर्वांनी एकजुटीने व मतभेद विसरून कामाला लागावे, असे आदेश यावेळी दिले.

पक्ष हायजॅक करणाऱ्यांबाबत तक्रार !

एकीकडे पक्षाची मनपा निवडणूक तयारी स्थानिक पातळीवर सर्व स्थानिक पदाधिकारी प्रामाणिकपणे करीत असताना काही पक्षाबाहेरील व काही नवखे पक्ष हायजॅक करण्याचा प्रयत्न करीत असल्या ची तक्रार काही नेत्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर व्यक्त केल्याची माहिती आहे.

तब्बल १५-२० मिनिटे गुप्त बैठक

विशेष म्हणजे तुषार भारतीय यांच्या निवासस्थानी भेट देण्यासाठी सीएम फडणवीस दुपारी २ ते २.३० वाजता पोहचले तेव्हा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. असे असताना वर्तमान राजकीय स्थिती पाहता वेळातील वेळ काढून मुख्यमंत्र्यांनी वरील निवडक पदाधिकाऱ्यांना बोलावून ही बैठक घेतली. सुमारे १५ ते २० मिनिटे ही बैठक चालली.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande