पालकांनी मुलांवर अपेक्षांचे ओझे लादायला नको : अभिनेते सुजित चौरे
बीड, 28 डिसेंबर (हिं.स.)। विद्याथ्यांनी करिअर निवडताना आपल्या आवडी, क्षमता, आणि कौशल्यांचा विचार करून निर्णय घ्यावा. पालकांनी आपल्या अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांचे ओझे मुलांवर लादायवा नको, असे मत अभिनेते सुजित चौरे यांनी व्यक्त केले. माजलगाव येथील
पालकांनी मुलांवर अपेक्षांचे ओझे लादायला नको : अभिनेते सुजित चौरे


बीड, 28 डिसेंबर (हिं.स.)।

विद्याथ्यांनी करिअर निवडताना आपल्या आवडी, क्षमता, आणि कौशल्यांचा विचार करून निर्णय घ्यावा. पालकांनी आपल्या अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांचे ओझे मुलांवर लादायवा नको, असे मत अभिनेते सुजित चौरे यांनी व्यक्त केले. माजलगाव येथील विद्याभुवन शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सिंदफणा पब्लिक स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.

सिंदफणा पब्लिक स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले. संमेलनाच्या प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य व नाट्य विभागप्रमुख प्रा. संजय देवळाणकर उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून प्राचार्य तसेच सीबीएसई बीड जिल्हा समन्वयक शितल सर्वज्ञ यांनी मार्गदर्शन केले. प्रमुख अतिथी म्हणून अभिनेते सुजित चौरे व संतोष वारे उपस्थित होते. याप्रसंगी आमदार प्रकाश सोळंके, शाळेच्या सचिव मंगल सोळंके, नीला देशमुख, यांच्यासह पालक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी अभिनेते सुजित चौरे यांनी विद्याथ्र्यांशी मनमोकळा संवाद साधताना आपल्या जीवनप्रवासाबद्दल सांगितले. ते म्हणाले, मीही बीड जिल्ह्यातील सामान्य कुटुंबातूनच पुढे आलो आहे. मेहनत, जिद्द आणि आई-वडिलांचे आशीर्वाद यामुळेच यश मिळते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांचा सदैव सन्मान करावा, त्यांना दुखावू नये. पालकांनीही मुलांच्या आवडीनुसार त्यांना शिक्षण व करिअरची दिशा निवडू द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

याच स्नेहसंमेलनाच्या

निमित्ताने विज्ञान प्रदर्शन तर कला विभागाने हस्तकला व कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वैज्ञानिक प्रकल्पांना उपस्थितांनी दाद दिली. सध्या वाढत चाललेल्या वृक्षतोडीच्या पार्श्वभूमीवर वृक्षसंवर्धन व पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करणारा विशेष प्रकल्प सादर केला, जो सर्वांचे लक्ष वेधून घेणारा ठरला.

स्नेहसंमेलनात विद्याथ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या विविध कला-गुणांचे दर्शन घडवणारे नृत्य, नाट्य, गीत, व समूह सादरीकरण कार्यक्रमांचे विशेष आकर्षण ठरले.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande