
परभणी, 28 डिसेंबर (हिं.स.)।
पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाल्यानंतर आता परभणी जिल्ह्यात हिवाळ्याने चांगलाच जोर धरला आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण मौसम सेवेच्या अंदाजानुसार जिल्ह्यात सलग २० दिवसांपासून किमान तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली नोंदवले जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये हुडहुडी भरली असून पहाटे व रात्री थंडीचा तीव्र कडाका जाणवत आहे.
डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच तापमानात मोठी घसरण झाली. ८ डिसेंबर रोजी किमान तापमान ६.६ अंश होते. तर ९ डिसेंबरला ५.९, १०
१२ डिसेंबरला ५.५ अंशांपर्यंत तापमान घसरले होते.
डिसेंबरला ५.७, ११ व १२ डिसेंबरला ५.५ अंशांपर्यंत तापमान खाली घसरले.
१३ डिसेंबरला ते ६.९ अंशांवर पोहोचले. त्यानंतरही थंडी कायम राहिली असून २४ डिसेंबरला ७.२, २५ व २६ डिसेंबरला सुमारे ७ अंश, तर २७ डिसेंबर रोजी ७.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. थंडी वाढल्याने पहाटे रस्त्यांवर शुकशुकाट दिसत असून नागरिक स्वेटर, शाल, जॅकेटचा आधार घेत आहेत. लहान मुले, वृद्ध व आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी, असा सल्ला आरोग्य तज्ज्ञांकडून दिला जात आहे. पुढील काही दिवस थंडी कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis