
अमरावती, 28 डिसेंबर (हिं.स.)।
अमरावती महानगरपलिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर शहरातील तिनहीझोनमध्ये १० ठिकाणी स्टॅटिक सर्विलान्स टिम (एसएसटी) करिता चेकपोस्ट तयार करण्यात आले आहेत. याक्रमाने वाहनांची तपासणी सुरु करण्यात आली आहे. मनपा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर प्रशासन सज्ज झाले आहे. आगामी १५ जानेवारीला महानगर पालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.
यादरम्यान कोणतीही अनुचित प्रकार घडू नये याकरिता खबरदारी घेतली जात आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदारांना प्रभावीत कंरण्यासाठी उपयोगात आणल्या जाणारी रोकड, मद्य तसेच प्रतिबंधीत वस्तुंच्या वाहतुकीवर कठोर नजर ठेवली जाणार आहे. याप्रकरणी पोलिसाच्या विशेष शाखा तसेच मनपाद्वारा एसएसटी पथकाच्या कार्याचे अपडेट घेतले जात आहे. विशेष शाखा अंतर्गत चेक पोस्टचे काम सुरु आहे. अमरावती महानगरपालिका निवडणुकांची आदर्श आचार संहिता लागू झाली आहे. या पार्श्वभुमीवर मतदारांना प्रभावीत केल्या जाणाऱ्या प्रलोभन व विविध प्रकारच्या अनियमतांवर अंकुश लावण्याच्या उद्देशाने मनपाच्या वतीने शहरातील विविध भागात लक्ष ठेवण्यासाठी पथक तैनात करण्यात आले आहे. हे एसएसटी संशयीत चारचाकी वदुचाकी वाहनांची तपासणी करीत आहेत. तपासणीदरम्यान विडिओरेकॉडींगही केली जात आहे. या तपासणीत हे पाहण्यातयेईल वाहनात निवडणूकीकरिता निर्धारीत परवानगीपेक्षा अधिक रोकड तर नाही, किंवा मद्याची वाहतूक तर केली जात नाही. याशिवाय एखाद्या राजकीय पक्षाच्या वाहनात ठरावीक मंजूर मर्यादेपेक्षा अधिकरोकड आढळून आल्यास, संबंधीत व्यक्तींना त्या रक्कमेच्या स्त्रोतची माहिती टीमला देणे आवश्यक राहील.
नामांकनानंतर तपासाला वेग
१० ठिकाणी बनविण्यात आलेल्या चेकपोस्ट करिता स्टैटिक सर्विलांस टीम (एसएसटी) मध्ये ४०, फ्लाइंग स्क्वॉड (एफएसी) मध्ये १६ आणि विडिओ सर्विलांस टीम (वीएसटी) मध्ये ८ जणांचा समावेश आहे. एकूण ६४ कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या बळावर तिनहीटीमशहरात सक्रीय झाल्या आहेत. नामांकन प्रक्रिया समाप्त झाल्यानंतर या टीम अधिक जोमाने कामाला लागतील. तपास प्रक्रियेत अद्याप काही मिळालेले नाही. या कामात मनपार प्रशासन पोलिस विभागाचे सहकार्य घेत आहे.
येथे आहेत चेक पोस्ट तैनात
विद्यापीठ मार्ग
सीआरपीएफ कॅम्प रोड
गौरी इन टर्निंग पॉइंट
रिंग रोड पोटे टाउनशिप
चांगापुर फाटा
छत्री तलाव ब्रिज
बडनेरा-यवतमाळ टी पॉइंट
बडनेरा-लोणी टी पॉइंट
रहाटगांव मार्ग
बातकोळी लोनटेक
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी