
अमरावती, 29 डिसेंबर (हिं.स.)अमरावती महापालिका निवडणुकीत सर्वच पक्षांकडे इच्छुकांची भाऊगर्दी झाल्याने बंडखोरीची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. अशातच भाजपाने अमरावती मध्ये उमेदवार यादी काही केल्या जाहीर केलेली नाही, परंतू सोमवारी सकाळीच उमेदवारांना अर्ज भरण्याचा मेसेज पोहोचविण्यात आला आहे. यामुळे तयारीत असलेल्या अनेक उमेदवारांनी आज अर्ज भरण्यासाठी महापालिकेची कार्यालये गाठण्यास सुरुवात केली आहे.
महत्वाचे म्हणजे या उमेदवारांना अर्ज भरण्यास सांगण्यात आलेले असले तरीही काहींना एबी फॉर्म मात्र देण्यात आलेला नाहीय, असे समजते आहे. तो उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपण्याच्या आत देण्यात येणार आहे. बंडखोरी टाळण्यासाठीअमरावती सह इतर शहरात इतरत्र ही क्लुप्ती भाजपाने वापरलेली आहे. यामुळे अधिकृत उमेदवार कोण असतील हे कळण्यासाठी उद्याची दुपार उलटण्याची शक्यता आहे. असे असले तरीही आपल्या जागी कोणाला उमेदवारी मिळाली, याची कुणकुण इतर इच्छुकांना लागलेली आहे.
दुपार पर्यत युती नव्हती झालेली
अमरावती शहरात भाजप शिवसेना शिंदे गट युती आज सोमवार दुपार पर्यंत झालेली नव्हती त्यामुळे कार्यकर्ते चांगलेच संभ्रमात होते.ना.संजय राठोड आज दुपारी ३ वाजता अमरावतीच्या हॉटेल मैफिल ला पोहचले त्यावेळी तयांनी कॅप्टन अभिजित अडसुळ व पक्ष निरीक्षक व काह पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली व नंतर निघून गेलेत त्यामुळे भाजप शिवसेना युती हि डुपर पर्यंत स्पस्ट झालेली नव्हती
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी