अमरावती : प्लॅस्टिकविरोधात महापालिकेची धडक कारवाई
अमरावती, 30 डिसेंबर (हिं.स.)। अमरावती शहर प्लॅस्टिकमुक्त करण्याच्या दिशेने अमरावती महानगरपालिकेने निर्णायक पाऊल उचलले आहे.मनपा आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या ठोस व कठोर निर्देशांनुसार महापालिकेच्या जनसंपर्क व संबंधित विभागांच्या संयुक्त पथकाने M
अमरावती MIDC मध्ये प्लॅस्टिकविरोधात महापालिकेची धडक कारवाई; ३९४ पोती जप्त, २५ लाखांचा साठा उध्वस्त


अमरावती, 30 डिसेंबर (हिं.स.)। अमरावती शहर प्लॅस्टिकमुक्त करण्याच्या दिशेने अमरावती महानगरपालिकेने निर्णायक पाऊल उचलले आहे.मनपा आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या ठोस व कठोर निर्देशांनुसार महापालिकेच्या जनसंपर्क व संबंधित विभागांच्या संयुक्त पथकाने MIDC परिसरात प्रतिबंधात्मक प्लॅस्टिकविरोधात मोठी कारवाई केली. रात्री उशिरा करण्यात आलेल्या या कारवाईत MIDC परिसरातील एका गोडाऊनवर छापा टाकून तब्बल ३९४ पोती प्रतिबंधित प्लॅस्टिक जप्त करण्यात आले. या प्लॅस्टिकचे एकूण वजन ११,८२० किलो असून त्याची अंदाजे बाजार किंमत सुमारे २५ लाख रुपये इतकी आहे. महापालिकेच्या पथकाने घटनास्थळी पंचनामा करून प्लॅस्टिक बंदी नियमांनुसार संबंधितावर ५,००० रुपयांचा दंड आकारला. ही कारवाई रात्री १२.३० वाजेपर्यंत सुरू होती. मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक साठवणूक व वितरण होत असल्याचे निदर्शनास आल्याने संपूर्ण साठा जप्त करून उध्वस्त करण्यात आला. या धडक कारवाईमुळे शहरात प्रतिबंधात्मक प्लॅस्टिकचा वापर व साठवणूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, महापालिकेच्या कठोर भूमिकेचा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे. आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी शहर स्वच्छ, सुंदर व पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी भविष्यातही अशाच प्रकारच्या कठोर व सातत्यपूर्ण कारवाया केल्या जातील, असा इशारा दिला आहे. प्लॅस्टिक बंदी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. ---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande