नाशिकच्या गामने मैदानात 168 जेष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी,
नाशिक, 29 डिसेंबर (हिं.स.)। बदलत्या जीवन शैलीमूळे सध्या मधुमेहाचे प्रमाणे झपाट्याने वाढत आहे याच मधुमेहाचा शरीरातील इतर अवयवांवर होणारे दुष्परिणाम थांबविण्यासाठी पंडीत कॉलनीतील देवगावकर हॉस्पिटलच्या वतीने शहरातील मैदानावर प्रसिद्ध मधुमेह तज्ज्ञ डॉ
गामने मैदानात 168 जेष्ठ नागरिकांची


नाशिक, 29 डिसेंबर (हिं.स.)। बदलत्या जीवन शैलीमूळे सध्या मधुमेहाचे प्रमाणे झपाट्याने वाढत आहे याच मधुमेहाचा शरीरातील इतर अवयवांवर होणारे दुष्परिणाम थांबविण्यासाठी पंडीत कॉलनीतील देवगावकर हॉस्पिटलच्या वतीने शहरातील मैदानावर प्रसिद्ध मधुमेह तज्ज्ञ डॉ. नारायण देवगावकर व किडनी विकार तज्ज्ञ डॉ. पार्थ देवगावकर यांच्या मार्गदर्शना खाली मोफत आरोग्य तपासणी शिबीर राबविले जात आहेत.वासन नगर येथील गामने मैदानात या शिबिरात 168 हुन अधिक नागरिकांनी लाभ घेतल्याची माहिती डॉ. पार्थ देवगावकर यांनी दिली. या शिबिरात रक्तातील साखरेचे प्रमाण, ब्लड प्रेशर, Hba1c या प्रकारच्या तपासण्या मोफत करण्यात आल्या.या सामाजिक उपक्रमाबद्दल गामने मैदानावरील मॉर्निंग ग्रुप जेष्ठ नागरिक संघातर्फे विशेष डॉ. देवगावकर कुटुंबियांचे कौतुक करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande