राष्ट्रवादीची आक्रमक एन्ट्री; काँग्रेस-भाजपची चिंता वाढविणारी !
लातूर, 29 डिसेंबर (हिं.स.)। लातूर महानगरपालिका निवडणुकीच्यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ने दाखविलेल्या मजबूत एन्ट्रीमुळे शहरातील राजकीय तापमान थंडीत चांगलेच वाढले आहे. आतापर्यंत काँग्रेस विरुद्ध भाजप अशी सरळ लढत होईल, अशी चर्चा
राष्ट्रवादी (अ.प. गट) ची आक्रमक एन्ट्री; काँग्रेस-भाजपची चिंता वाढविणारी !


लातूर, 29 डिसेंबर (हिं.स.)। लातूर महानगरपालिका निवडणुकीच्यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ने दाखविलेल्या मजबूत एन्ट्रीमुळे शहरातील राजकीय तापमान थंडीत चांगलेच वाढले आहे. आतापर्यंत काँग्रेस विरुद्ध भाजप अशी सरळ लढत होईल, अशी चर्चा असताना राष्ट्रवादीने केलेल्या आक्रमक हालचालींमुळे तिसरा प्रभावी पर्याय उभा राहत असून नवीन राजकीय समीकरण आकार घेत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढवण्यासोबतच राष्ट्रवादीची मदत घेतल्याशिवाय सत्ता स्थापन होणार नाही, असा ठाम दावा राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी लातूर येथील पक्षाच्या कार्यक्रमात केला. शिवसेना (शिंदे गट) मधून राष्ट्रवादीत प्रवेश करणारे बळवंत जाधव, सुनील बसपुरे, बालाजीराव जाधव, अक्षय पिनाटे यांच्यासह विविध कार्यकर्त्यांच्या स्वागतप्रसंगी ते बोलत होते.यावेळी माजी मंत्री व आमदार संजय बनसोडे, शिक्षक आमदार विक्रमबप्पा काळे, प्रदेश सरचिटणीस ड. वेंकटराव बेद्रे, शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांसह पक्षाचे अनेक मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रवादीत होत असलेल्या कार्यकर्त्याच्या प्रवेशामुळे पक्षाची संघटनशक्ती वाढली असून शहरात पक्ष अधिक जोमाने उभारी घेत असल्याचे बाबासाहेब पाटील यांनी स्पष्ट केले. महापालिकेच्या निवडणुकीत महायुती करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे; मात्र युती न झाल्यास स्वबळावर ताकदीने लढणार, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. उमेदवारी 'इलेक्टिव्ह मेरिट'वर देऊन जितके उमेदवार दिले जातील तेवढ्यांना विजयी करण्याचा संकल्प असल्याचेही त्यांनी सांगितले.दरम्यान, राष्ट्रवादीच्या वाढत्या सक्रियतेमुळे काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये हालचाल वाढली आहे. आतापर्यंत दोन्ही पक्षांमध्ये विभागले्जाणार मतांचे समीकरण

राष्ट्रवादीच्या बाजूने वळण्याची शक्यता असल्याचे राजकीय व्यक्त वर्तुळात केली जात आहे. संभाव्य उमेदवारही स्थिर नेतृत्व आणि काम करणाऱ्यांना संधी देणारी कार्यसंस्कृती पाहता राष्ट्रवादीकडे आकर्षित होत असल्याची चर्चा आहे.लातूरमधील निवडणूक ही फक्त राजकीय सत्तासमीकरणाची नव्हे, तर शहराच्या विकासदिशेसाठी निर्णायक ठरणारी आहे. पाणीपुरवठा, रस्ते, कचरा व्यवस्थापन, वाढत्या शहराचे नियोजन या मुद्यांवर ठोस भूमिका आणि विश्वासार्ह नेतृत्व दाखवण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न सुरू आहे.या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी (अजित पवार गट) लातूरमध्ये केवळ मजबूत उपस्थिती नोंदवेल की सत्ता समीकरण बदलणारी निर्णायक ताकद ठरेल, हे येणाऱ्या काही दिवसांत होणारे पक्षनिर्णय, उमेदवारी प्रक्रिया आणि प्रचारशैली ठरवतील

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande