कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा 36-30-15 फॉर्म्यूला, नावांची यादी मंगळवारी
कोल्हापूर, 29 डिसेंबर (हिं.स.)। कोल्हापूर महानगरपालिका निवडणूकीसाठी महायुतीचा वतीने जागावाटप निश्चित करण्यात झाले असून 36-30-15 हा फॉर्म्यूला असल्याची माहिती महायुतीच्या जिल्हयातील वरिष्ठ नेत्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केला. पण उमेदवारांच्
महायुतीची पत्रकार परिषद


कोल्हापूर, 29 डिसेंबर (हिं.स.)।

कोल्हापूर महानगरपालिका निवडणूकीसाठी महायुतीचा वतीने जागावाटप निश्चित करण्यात झाले असून 36-30-15 हा फॉर्म्यूला असल्याची माहिती महायुतीच्या जिल्हयातील वरिष्ठ नेत्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केला. पण उमेदवारांच्या नावांची यादी मात्र अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. महायुतीतून निवडणूक लढवण्याची इच्छुक असलेल्या अनेक उमेदवारांना उमेदवारी मिळणार नसल्याची खात्री झाल्यामुळे काही जणांनी थेट आत्मदहन, बंडखोरी तसेच पक्षांतराचे इशारे दिले आहेत. यामुळे महायुतीकडून अखेरच्या दिवशी उमेदवारांची नावे प्रसिद्ध करण्याची सावधगिरी बाळगण्यात येत आहे. ज्यांची नावे निश्चित करण्यात आली आहे त्यातील काही जणांना उमेदवारी निश्चित झाली असल्याचे सांगितले आहे तर काही जणांना उमेदवारी मिळणार नसल्याचे स्पष्ट सांगितले आहे यातूनच नाराजीचे प्रमाण वाढले आहे.

महायुतीच्या ऊमेदवारांच्या यादीतील नावाबाबतचा संभ्रम कायम आहे. महायुतीतील घटक पक्ष असलेले भाजप, शिवसेना शिंदे गट, आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या नेत्यांनी गेले दोन दिवस बैठकीच्या अनेक फेऱ्या केल्यानंतर जागा वाटपाच्या संख्या निश्चित झाल्या पण त्यातील नावे निश्चित करण्याबाबत काही अडचणी आल्याचे दिसून आले आहे. महायुतीतील उमेदवारांच्या नावांची यादी निश्चित झाली असून ती राज्यपातळीवरील वरिष्ठ नेत्यांकडून मंजुरी घेऊन प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले.

भाजपचे नेते राज्यसभा खासदार धनंजय महाडिक, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते मंत्री हसन मुश्रीफ, शिवसेना शिंदे गटाचे नेते पालकमंत्री प्रकाश आंबेडकर व आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह आमदार अमल महाडिक, प्रा. जयंत पाटील, सत्यजित कदम, माजी आमदार जयश्री जाधव यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन महायुतीतील जागा वाटपाचे सूत्र सांगितले. यामध्ये भाजपला 36, शिवसेना शिंदे गट 30, आणि राष्ट्रवादी अजित पवार गट 15 जागा देण्याचे निश्चित केले असल्याचे सांगितले. या यादीतील नावे मात्र उद्या मंगळवारी जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केले. उमेदवारी यादीतील नावे निश्चित झाली असून काही जण नाराज झाले आहेत. या नाराज उमेदवारांची दिलगिरीही या नेत्यांनी व्यक्त केली. तसेच ज्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यांना महायुतीतून दुसरी संधी दिली जाईल असेही स्पष्ट केले.

याबाबत खासदार धनंजय महाडिक म्हणाले की ज्यांना उमेदवारी मिळाली नाही ते नाराज आहेत पण त्यांनी नाराज होऊ नये. केंद्रात व राज्यात महायुतीचे सरकार असल्यामुळे अनेक जणांना वेगवेगळ्या संधी देता येईल. तसेच कोल्हापूर शहराचा सर्वांगीण विकास महायुतीच करू शकणार आहे. कारण महायुतीकडून निधी कमी पडणार नाही. विरोधी महाविकास आघाडीकडे आघाडीकडे कोणतीही सत्ता नसल्यामुळे त्यांच्याकडून शहराचा विकास होणार नाही. त्यामुळे ते फक्त घोषणा करू शकतात. यावेळी नामदार हसन मुश्रीफ म्हणाले की विरोधी आघाडीचे नेते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी आपल्या उमेदवारांना क्रॉस वोटिंग करू नये असे आवाहन केले आहे आणि तसे झाले तर राजीनामा घेऊ असा इशाराही दिला आहे. पण प्रत्यक्षात तसा कोणताही कायदा नाही आणि मतदारच याबाबत निर्णय घेऊ शकतात. महायुतीने राज्यात जनतेला दिलेली अश्वासने पूर्ण केली आहेत. लाडकी बहीण योजनेतून गेले १ वर्ष पैसे दिले आहेत. गेल्या दोन माहिन्याचेही पैसे मिळणार आहेत. आणि २१०० रु. करण्याचा निर्णयही लवकरच होईल.

यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केंद्रात व राज्यात महायुतीचे सरकार असल्यामुळे कोल्हापूर शहराचा विकास करण्यासाठी निधी आणण्यात कोणतीही अडचण येणार नाही. त्यामुळे महायुतीकडून शहरातील सर्व प्रश्न सुटणार तसेच कोल्हापूर शहराचा चेहरा-मोहरा बदलून जाईल असे सांगितले.

यावेळी

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande