अकोल्यात भाजपकडून युतीसाठी अखेरचा अल्टिमेटम
अकोला, 29 डिसेंबर (हिं.स.)। अकोला शहरात सध्या महायुतीच्या जागावाटपावरून मोठी चर्चा रंगली आहे.गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये जागावाटपाच्या मुद्द्यावरून बैठकींची मालिका सुरू आहे.मात्र अद्यापही कोणताही ठोस तोडगा निघालेला नसल्य
P


अकोला, 29 डिसेंबर (हिं.स.)।

अकोला शहरात सध्या महायुतीच्या जागावाटपावरून मोठी चर्चा रंगली आहे.गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये जागावाटपाच्या मुद्द्यावरून बैठकींची मालिका सुरू आहे.मात्र अद्यापही कोणताही ठोस तोडगा निघालेला नसल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये प्रचंड संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.काल महायुतीकडून जागावाटपाबाबत अधिकृत घोषणा होण्याची अपेक्षा होती. मात्र जागावाटपाचा तिढा कायम राहिल्याने ही घोषणा ऐनवेळी फसली. त्यानंतर भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या नेत्यांमध्ये अनेक बैठका पार पडल्या, तरीही एकमत होऊ शकलेले नाही.अखेर भाजपाचे आमदार रणधीर सावरकर यांनी मित्र पक्षांना थेट अल्टिमेटम दिला आहे. येत्या काही तासांत मित्र पक्षांनी आपली स्पष्ट भूमिका जाहीर केली नाही, तर भाजप स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्यास सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे अकोल्यातील राजकीय वातावरण अधिक तापले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande