अकोला: विधानसभेतील भाजप बंडखोरांची अखेर भाजप मध्ये घर वापसी
अकोला, 29 डिसेंबर (हिं.स.)। महापालिका निवडणूकिचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याला अखेरचा दिवस शिल्लक असतानाच अकोल्यातील राजकारण चांगलच तापलं आहे.. विधानसभेच्या निवडणुकीत भाजपशी बंडखोरी करून वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी घेऊन लढलेले हरीश अलिमचंदानी यांनी
P


अकोला, 29 डिसेंबर (हिं.स.)। महापालिका निवडणूकिचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याला अखेरचा दिवस शिल्लक असतानाच अकोल्यातील राजकारण चांगलच तापलं आहे.. विधानसभेच्या निवडणुकीत भाजपशी बंडखोरी करून वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी घेऊन लढलेले हरीश अलिमचंदानी यांनी अखेर भाजप मध्ये घर वापसी केली आहे.. अलिमचंदानी यांचं बंड शमविण्यासाठी भाजपला मोठी कसरत करावी लागली.. महापालिका निवडणूक जाहीर होताच हरीश अलिमचंदानी यांनी तिसऱ्या आघाडीची तयारी केली होती.. त्यांनी भाजप विरोधात बंडाचा झेंडा फडकवला होता.. मात्र वरिष्ठ पातळीवरील हालचाली पाहता.. भाजपसमोर बंडखोरांचे मोठे आव्हान उभे ठाकले होते.. बंडखोरांना अखेर भाजपकडून शांत करण्यात आले आहे.. आज भाजप कार्यालयात झालेल्या एका सोहळ्यात अलिमचंदानी यांनी अखेर भाजपची वाट धरत भाजपमध्ये पुन्हा प्रवेश केल्याने भाजपची खेळी यशस्वी झाल्याची चर्चा अकोल्याच्या राजकारणात रंगली आहे..

भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करून माजी नगरसेवक हरीश आलीम चंदानी यांनी भारतीय जनता पक्षामध्ये पुन्हा काम करण्याचा निर्णय घेतला आहे.. त्यांचा निलंबन परत घेण्यात आले असल्याची माहिती भाजपकडून देण्यात आली आहे.. यावेळी त्यांचे स्वागत खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, जयंत मसने, संतोष शिवरकर, बाछुका, रंजीत खेडकर बालटाले, रवींद्र भन्साली, गिरीश जोशी, अजय शर्मा माधव मानकर, डॉक्टर अमित कावरे,सजयगोटफोडे, नितेश पाली आधी प्रामुख्याने उपस्थित होते.. यावेळी भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळून देऊ यासाठी एकत्र येऊन काम करू पक्ष जो आदेश देईल तो आदेशाचा पालन करेल अशा शब्दात हरीश आलीम चंदानी यांनी आपल्या घरवाशीचा स्वागत केला आणि पक्ष नेतृत्व प्रदेश आणि स्थानिक नेतृत्वाचे आभार व्यक्त केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande