शिवसेनेचे अशोक पाटील उमरेकर यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
नांदेड, 29 डिसेंबर (हिं.स.)। नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा शिवसेना दक्षिण विधानसभा प्रमुख अशोक पाटील उमरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते माजी खासदार तथा लोहा विधानसभा मतदार
शिवसेनेचे अशोक पाटील उमरेकर यांचा राष्ट्रवादीत प्रवेश


नांदेड, 29 डिसेंबर (हिं.स.)।

नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा शिवसेना दक्षिण विधानसभा प्रमुख अशोक पाटील उमरेकर यांनी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते माजी खासदार तथा लोहा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत साई - सुभाष, वसंतनगर, नांदेड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये पक्ष प्रवेश केला.

नांदेड वाघाळा महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणामध्ये पक्षांतर होत आहे. विविध पक्षातील नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रवेश करीत आहेत या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला जात आहे

यावेळी माजी आमदार मोहनराव हंबर्डे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष माधव पावडे, नेताजी भोसले यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande