पुण्यात बंडखोरी व पक्षांतर रोखण्यासाठी भाजपची रणनीती!
पुणे, 29 डिसेंबर (हिं.स.)। भाजपने उमेदवारांची यादी जाहीर करण्यावरून तारखांचा लपंडाव सुरु केला आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांचा जीव टांगणीला लागलेला असताना आता भाजपकडून उमेदवारी यादी जाहीर केली जाणार नाही. ज्यांची उमेदवारी निश्‍चित झाली आहे अशांना
पुण्यात बंडखोरी व पक्षांतर रोखण्यासाठी भाजपची रणनीती!


पुणे, 29 डिसेंबर (हिं.स.)।

भाजपने उमेदवारांची यादी जाहीर करण्यावरून तारखांचा लपंडाव सुरु केला आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांचा जीव टांगणीला लागलेला असताना आता भाजपकडून उमेदवारी यादी जाहीर केली जाणार नाही. ज्यांची उमेदवारी निश्‍चित झाली आहे अशांना थेट फोन करून अर्ज भरण्याचा निरोप दिला जाणार आहे. त्यांना पक्षातर्फे एबी फॉर्मही पोहच केला जाणार आहे. बंडखोरी टाळण्यासाठी भाजपने ही चाल खेळली आहे.पुणे महापालिकेसाठी भाजपकडे इच्छुकांची झुंबड उडाली आहे. प्रत्येक प्रभागात ३० पेक्षा जास्त इच्छुक आहेत. त्यामुळे कोणत्या कार्यकर्त्याला उमेदवारी द्यायची याचा पेच निर्माण झाला आहे. आपले नाव उमेदवार यादीत यावे यासाठी इच्छुकांकडून भाजपच्या नेत्यांना भेटण्यासाठी कायम गर्दी होत आहे. त्यातील अनेक जण हे उमेदवारी आपल्यालाच मिळणार असल्याचे सांगत थेट प्रचार सुरु केला आहे. एकाच प्रभागात अनेकजण असा प्रचार करत असल्याने नेमकी उमेदवारी कोणाला मिळणार हे कळत नाही अशी स्थिती आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande