चंद्रपूर: ६६ नामनिर्देशन पत्र दाखल
चंद्रपूर, 29 डिसेंबर (हिं.स.)।चंद्रपुर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवार २९ डिसेंबर २०२५ रोजी ६६ नामनिर्देशन दाखल करण्यात आली आहे. तसेच ३०० नामनिर्देशन पत्रांची उचल करण्यात आली आहे. मनपा सार्वत्रिक निवडणूकीसाठी नामनिर्देशन दाखल करण्य
चंद्रपूर: ६६ नामनिर्देशन पत्र दाखल


चंद्रपूर, 29 डिसेंबर (हिं.स.)।चंद्रपुर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवार २९ डिसेंबर २०२५ रोजी ६६ नामनिर्देशन दाखल करण्यात आली आहे. तसेच ३०० नामनिर्देशन पत्रांची उचल करण्यात आली आहे.

मनपा सार्वत्रिक निवडणूकीसाठी नामनिर्देशन दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची ५ कार्यालये मिळुन एकुण १७३ इच्छूकांनी ३०० नामनिर्देशन पत्रांची उचल केली. नामनिर्देशन पत्रे ही केवळ प्रत्यक्षरित्याच (ऑफलाईन) सादर करता येत आहेत.

उद्या ३० डिसेंबर २०२५ (मंगळवार) शेवटच्या दिवशी सकाळी 11 ते दुपारी 3 या कालावधीत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande