छत्रपती संभाजीनगर -वंचितची पहिली यादी जाहीर
छत्रपती संभाजीनगर, 29 डिसेंबर (हिं.स.)छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक एकत्र लढवण्यासाठी उद्धवसेना आणि काँग्रेसमध्ये आघाडीच्या प्रयत्नांना गती मिळाली नाही. दोन्ही पक्षांचे प्रमुख नेते शहरात असताना वाटाघाटींसाठी बैठकच झाली नाही. उमेदवारी अर्ज भ
मनपा


छत्रपती संभाजीनगर, 29 डिसेंबर (हिं.स.)छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक एकत्र लढवण्यासाठी उद्धवसेना आणि काँग्रेसमध्ये आघाडीच्या प्रयत्नांना गती मिळाली नाही. दोन्ही पक्षांचे प्रमुख नेते शहरात असताना वाटाघाटींसाठी बैठकच झाली नाही. उमेदवारी अर्ज भरण्यास अवघे दोन दिवस उरले असतानाही आघाडीबाबत चर्चा ठप्प आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने र चार उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. प्रभाग क्रमांक ९ साठी सर्वसाधारण, महिला, ओबीसी महिला व अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारांचा समावेश आहे.

छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसमध्ये युती होण्याची शक्यता दिसत असतानाच पुन्हा बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या युतीवर अद्याप तरी कोणतेही शिक्कामोर्तब झाले नसले तरी दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षामध्ये एकमत होण्याची शक्यता दिसत आहे. चारही पक्षाने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande