आंतरराष्ट्रीय दुसर्‍या फुले फेस्टिवलच्या सत्राध्यक्षपदी अ‍ॅड. शंकर कदम यांची निवड
परभणी, 29 डिसेंबर (हिं.स.)।आंतरराष्ट्रीय दुसर्‍या फुले फेस्टिवलच्या सत्राध्यक्षपदी अ‍ॅड. शंकर कदम यांची निवड झाली आहे संवेदनशील साहित्यिक विजय वडवेराव यांच्या संकल्पनेतून साकारलेले दुसरे आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल 2026 पुणे येथे 1 ते 4 जा
आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल 2026 पुणे येथे 1 ते 4 जानेवारी या कालावधीत सलग चार दिवस


परभणी, 29 डिसेंबर (हिं.स.)।आंतरराष्ट्रीय दुसर्‍या फुले फेस्टिवलच्या सत्राध्यक्षपदी अ‍ॅड. शंकर कदम यांची निवड झाली आहे संवेदनशील साहित्यिक विजय वडवेराव यांच्या संकल्पनेतून साकारलेले दुसरे आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल 2026 पुणे येथे 1 ते 4 जानेवारी या कालावधीत सलग चार दिवस आयोजित करण्यात आले आहे. या आंतरराष्ट्रीय पुणे फेस्टिवल अंतर्गत होणार्‍या विविध कवी संमेलन सत्रांपैकी एका सत्राच्या अध्यक्षपदी परभणी येथील कवी अ‍ॅड. शंकर कदम यांची निवड करण्यात आली आहे.

या फेस्टिवलसाठी भारतासह विविध देशांतील फुलेप्रेमी साहित्यिक पुण्यात दाखल होणार असून चार दिवस साहित्यिक विचारांची देवाणघेवाण, काव्यवाचन व चर्चा रंगणार आहेत. फेस्टिवलमधील सर्व सत्रांची सुयोग्य व्यवस्था संयोजकांच्या वतीने करण्यात आली आहे. या चार दिवसांच्या कालावधीत सहभागी साहित्यिकांना नाश्ता व भोजनाची व्यवस्था, तसेच सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन यथोचित गौरव करण्यात येणार आहे.

दरम्यान, अ‍ॅड. कदम यांच्या निवडीमुळे परभणी जिल्ह्यातील साहित्यिक वर्तुळातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande