मूल्यवर्धन शिक्षण हाच सामाजिक ग्रंथ - सुदर्शन चिटकुलवार
पाथरी तालुक्यात ‘मूल्यवर्धन 3.0’ च्या अंतिम टप्प्यातील प्रशिक्षण परभणी, 29 डिसेंबर (हिं.स.)। मूल्ये ही मानवी जीवनाचा अविभाज्य भाग असून मूल्यवर्धन शिक्षण हा एक सामाजिक ग्रंथ आहे, असे मत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट), परभणीचे प
मूल्यवर्धन शिक्षण हाच सामाजिक ग्रंथ - सुदर्शन चिटकुलवार


पाथरी तालुक्यात ‘मूल्यवर्धन 3.0’ च्या अंतिम टप्प्यातील प्रशिक्षण

परभणी, 29 डिसेंबर (हिं.स.)। मूल्ये ही मानवी जीवनाचा अविभाज्य भाग असून मूल्यवर्धन शिक्षण हा एक सामाजिक ग्रंथ आहे, असे मत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट), परभणीचे प्राचार्य सुदर्शन चिटकुलवार यांनी व्यक्त केले.

आजच्या विज्ञानयुगात नैतिक, सामाजिक, कौटुंबिक तसेच संविधानिक मूल्ये हळूहळू हरवत चालल्याची जाणीव लक्षात घेऊन शांतीलाल मुथा फाउंडेशनने शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्यासोबत सामंजस्य करार करून राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘मूल्यवर्धन 3.0’ हा अभिनव शैक्षणिक उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमाच्या अनुषंगाने पाथरी तालुक्यात ‘मूल्यवर्धन 3.0’ च्या अंतिम टप्प्यातील प्रशिक्षण संपन्न झाले. या प्रशिक्षणात जिल्हा परिषद व खाजगी अनुदानित शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या 120 शिक्षकांचा सहभाग होता. पाथरी येथील शिक्षणाधिकारी कार्यालय व पंचायत समिती यांच्या वतीने हे प्रशिक्षण येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात आयोजित करण्यात आले होते.

या प्रशिक्षणास जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट), परभणीचे प्राचार्य सुदर्शन चिटकुलवार व अधिव्याख्याता परिहार यांनी भेट दिली. यावेळी मार्गदर्शन करताना चिटकुलवार म्हणाले की, मूल्ये ही मानवी जीवनाचा अविभाज्य भाग असून मूल्यवर्धन शिक्षण हा एक सामाजिक ग्रंथ आहे. या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांमध्ये मूल्यसंवर्धन घडवून आणण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे. मूल्यवर्धन शिक्षणामुळे भविष्यातील पिढी अधिक कल्पक, चिकित्सक विचारसरणीची, सर्जनशील, जबाबदार, संवेदनशील तसेच समस्या सोडविण्याची क्षमता असलेली घडू शकते, असे त्यांनी नमूद केले. या प्रशिक्षणात विविध जीवनमूल्यांवर आधारित चर्चा, कृती व उपक्रमांचे सादरीकरण गटशिक्षण अधिकारी मुकेश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. प्रशिक्षण सुलभक म्हणून कुसुम कचवे, सुधीर पाटील, दीपक रणदिवे, राजू उबाळे, अमोल जगताप व संपत राऊत यांनी जबाबदारी पार पाडली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande