नाशिकच्या सिडको विभागीय कार्यालयात उमेदवारांचा गोंधळ, पोलिसांचा हस्तक्षेप
नाशिक, 29 डिसेंबर (हिं.स.)। - महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रशासनाचे नियोजन कोलमडल्यामुळे सिडको विभागीय कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणावर गोंधळ झाला . हा गोंधळ शांत करण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला . राज्यात महान
प्रशासनाचे नियोजन कोलमडल्याने


प्रशासनाचे नियोजन कोलमडल्याने


नाशिक, 29 डिसेंबर (हिं.स.)। - महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रशासनाचे नियोजन कोलमडल्यामुळे सिडको विभागीय कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणावर गोंधळ झाला . हा गोंधळ शांत करण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला . राज्यात महानगरपालिका निवडणुकीची धामधूम सुरू आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायचा उद्या मंगळवार हा शेवटचा दिवस आहे. पर्यंत राजकीय पक्षांची उमेदवारी घोषित झालेली नाही पण आज सोमवार महत्वाचा दिवस आहे आणि उद्या मंगळवार हा शेवटचा दिवस असल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अधिक गर्दी होण्याची शक्यता असल्याने बहुतेक उमेदवारांनी आज सोमवारीच उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सर्व विभागीय कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. सोमवारी अपेक्षेप्रमाणे गर्दी झाली पण नाशिक महानगरपालिकेच्या सिडको या विभागिय कार्यालयामध्ये सकाळपासूनच नियोजन कोलमडले त्यामुळे या ठिकाणी उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तसेच त्यांच्या कागदपत्राची छाननी करण्यासाठी म्हणून अर्धा तासापेक्षा अधिक काळ लागत होता त्यामुळे उमेदवारांची संख्या जास्त असूनही कोणत्याही नियोजन नसल्याकारणाने या ठिकाणी महापालिका प्रशासनाचे नियोजन कोण म्हणले तीन वाजले तरी देखील 50 पेक्षाही अधिक उमेदवार हे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रतीक्षेत होते आणि या तीन वाजता आल्यानंतर उमेदवारांचा संयम सुटला आणि त्यांनी तातडीने आमचे उमेदवारी अर्ज दाखल करून घ्या अशी मागणी केली यावरून काही उमेदवार हे थेट विभागीय कार्यालयात घुसले त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी केलेल्या गर्दीमुळे एकच गोंधळ झाला. या गोंधळावरती नियंत्रण मिळवण्यासाठी स्वतः विभागीय अधिकारी नाना साळवे तसेच समोरील पोलीस स्टेशनचे काही कर्मचारी व बंदोबस्तावरील कर्मचारी हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले पण गोंधळ खूपच असल्यामुळे त्यावर नियंत्रण मिळवायला सुमारे एक तासापेक्षा अधिक कालावधी लागला त्यानंतर उमेदवारांना टोकन देण्यात आले आणि नंतर त्यांचे उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली पण यामुळे महानगरपालिका प्रशासनाचा गोंधळ समोर आला आहे. याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेले उमेदवार वंदना जाधव यांनी सांगितले की, महानगरपालिका प्रशासनाचे कोणतेही नियोजन नव्हते त्यामुळे हा सगळा गोंधळा तयार झाला सुमारे एक तासापेक्षा अधिक काळ हा उमेदवारांना लागत होता यामध्ये महिला उमेदवारांना खूपच त्रास सहन करावा लागला गोंधळामध्ये तर महिला उमेदवारांना धक्काबुक्की देखील झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande