कडेकोट बंदोबस्तात ईव्हीएम यंत्रे पिंपरीत दाखल
पुणे, 29 डिसेंबर (हिं.स.)। पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीकरिता १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी वापरण्यात येणारी ईव्हीएम यंत्रे व निवडणूक अनुषंगिक साहित्य महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार बीड व कोल्हापूर जिल्
कडेकोट बंदोबस्तात ईव्हीएम यंत्रे पिंपरीत दाखल


पुणे, 29 डिसेंबर (हिं.स.)। पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीकरिता १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी वापरण्यात येणारी ईव्हीएम यंत्रे व निवडणूक अनुषंगिक साहित्य महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार बीड व कोल्हापूर जिल्ह्यातील संबंधित तालुक्यांतून पिंपरी येथे सुरक्षितरीत्या आणण्यात आले आहे. यामध्ये बीड जिल्ह्यातील गेवराई, पाटोदा व आष्टी तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी, आजरा, कागल, भुदरगड, गडहिंग्लज व चंदगड येथील ईव्हीएम यंत्रांचा समावेश आहे. हे साहित्य चार स्वतंत्र वाहनांच्या ताफ्यामध्ये, पूर्वनियोजित मार्ग व नकाशानुसार पिंपरी येथे आणण्यात आले.या संपूर्ण कामकाजासाठी नियुक्त नोडल अधिकारी प्रमोद ओंभासे यांच्यासह सहाय्यक नोडल अधिकारी सुनील पवार, अभिमान भोसले, संतोष कुदळे, राहुल पाटील व इंद्रजीत जाधव यांच्या समन्वयाने सुमारे २७ महापालिका कर्मचारी, १२ व्हिडिओ कॅमेरामन व १६ सशस्त्र पोलिस कर्मचारी असा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या निर्देशानुसार तयार करण्यात आलेल्या सुसज्ज स्ट्राँग रूममध्ये ही सर्व ईव्हीएम यंत्रे सुरक्षित ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यावेळी स्थानिक राजकीय पक्षांचे नियुक्त पदाधिकारी यांना पुर्वसुचना देऊन नियमानुसार पाहणीसाठी बोलविण्यात आले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande