‘खान्देश रन’ स्पर्धकांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद २५०० धावपटूंनी सहभाग
जळगाव , 29 डिसेंबर (हिं.स.)जळगाव रनर्स ग्रुपच्या वतीने आज सागर पार्क, जळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या खान्देश रन (मॅरेथॉन) ला धावपटूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेत ३, ५, १० व २१ किलोमीटरसाठी सुमारे २५०० धावपटूंनी सहभाग नोंदवला. खान्देश
‘खान्देश रन’ स्पर्धकांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद  २५०० धावपटूंनी सहभाग


जळगाव , 29 डिसेंबर (हिं.स.)जळगाव रनर्स ग्रुपच्या वतीने आज सागर पार्क, जळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या खान्देश रन (मॅरेथॉन) ला धावपटूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेत ३, ५, १० व २१ किलोमीटरसाठी सुमारे २५०० धावपटूंनी सहभाग नोंदवला. खान्देश रनच्या सुरुवाती प्रसंगी २१ किलोमीटरसाठी हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी जैन इरिगेशनचे अशोक जैन, अतुल जैन व अथांग जैन, पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, सुप्रीम इंडस्ट्रीजचे सुरेश मंत्री, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उद्योजक मनोज अडवाणी, राजेश चोरडिया तसेच जळगाव रनर्स ग्रुपचे अध्यक्ष किरण बच्छाव आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेला अधिकृत सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमादरम्यान लोकेश साळुंखे, सागर सोनवणे व याशिका किनाडा यांनी मनोरंजनातून उपस्थितांमध्ये उत्साह निर्माण केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभावीपणे पार पडले, तर आयोजनाची जबाबदारी जळगाव रनर्स ग्रुपने समर्थपणे सांभाळली. या यशस्वी आयोजनासाठी जळगाव रनर्स ग्रुपच्या सुमारे १०० सदस्यांनी गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने मेहनत घेतली. नियोजन, मार्गदर्शन, सुरक्षितता, पाणीपुरवठा, वैद्यकीय सेवा व स्वयंसेवकांचे व्यवस्थापन यामुळे खान्देश रन अत्यंत शिस्तबद्ध व सुरक्षित वातावरणात पार पडली. खान्देश रनच्या माध्यमातून आरोग्य, फिटनेस आणि धावण्याची संस्कृती रुजवण्याचा संदेश देण्यात आला असून, या स्पर्धेमुळे जळगाव शहराची क्रीडाक्षेत्रातील ओळख अधिक भक्कम झाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande