
लातूर, 29 डिसेंबर (हिं.स.)।
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणारी एनएमएमएस व परीक्षा जिल्ह्यातील ड २२ केंद्रावर पार पडली. इयत्ता आठवी - वर्गातील तब्बल ८ हजार १२४ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली असून ८ हजार २९ विद्यार्थ्यांनी दोन सत्रात परीक्षा दिली. शिक्षण विभागाच्या वतीने परीक्षेच्या अनुषंगाने तयारी पूर्ण केली असून व एकही केंद्रावर गैरप्रकार झाला न नसल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. या परीक्षार्थीच्या मधून वर्गनिहाय मेरिट नुसार ३२५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. यामध्ये पात्र विद्यार्थ्यांना ४ वर्षासाठी ४८ हजार रुपये शिष्यवृत्ती मिळेल.
अनुदानित व जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी शासनाकडून विविध योजना राबवल्या जातात. एनएमएमएस परीक्षा इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी घेतली जाते. यंदाची परीक्षा दोन सत्रात परीक्षा घेण्यात आली. पहिला पेपर सकाळी १०.३० ते दुपारी १२ व दुसरा पेपर दुपारी १:३० ते ३ वाजता झाला.
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis