
नांदेड, 29 डिसेंबर (हिं.स.)। नांदेड जिल्ह्यातील भोकर विधानसभा मतदारसंघाच्या भारतीय जनता पक्षाचे आमदार श्री जय अशोक चव्हाण यांनी आज भोकर येथे बैठक घेतली.
भोकर नगर परिषदेचे भाजपचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष भगवानराव दंडवे आणि भाजपच्या सर्व नगरसेवकांसमवेत आज बैठक घेतली.
याप्रसंगी शहरातील विकासकामांवर आणि पुढील रोडमॅपबाबत विचारविनिमय झाला.भोकर नगर परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष म्हणून भगवानराव दंडवे हे निवडून आले आहेत भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी मोठे यश मिळाले आहे याबद्दल आमदार चव्हाण यांनी कौतुक केले भोकर शहरातील नागरिकांसाठी चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या सुविधा देण्यावर या बैठकीमध्ये भर देण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis