
कोल्हापूर, 29 डिसेंबर (हिं.स.) - २५ डिसेंबरपासून आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे श्री महालक्ष्मीदेवीच्या दर्शनासाठी भाविकांचा अक्षरश: जनसागर उसळला आहे. २४ डिसेंबरपासून ५ दिवसांत ८ लाख ७० हजार भाविकांनी श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेतले. यात २६ डिसेंबरला २ लाख ३७ हजार इतक्या भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. नवरात्रीच्या ९ दिवसांमध्येही कधी इतकी गर्दी झाली नव्हती. २८ डिसेंबरला पहाटे मंदिर उघडण्याच्या अगोदरपासूनच लांबलचक रांग लागली होती. भाविक आणि पर्यटक यांमुळे कोल्हापूर शहर गजबजून गेले होते. श्रीक्षेत्र नृसिंहवाडी, तसेच गगनबावडा-पन्हाळा, विशाळगड येथेही भाविक-पर्यटक यांची गर्दी दिसून आली. ५ जानेवारीपर्यंत ही गर्दी कायम राहिल असा कयास आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी