
नांदेड, 29 डिसेंबर (हिं.स.)। नांदेड वाघाळा शहरमहानगरपालिकेच्या निवडणुकीच्या ऐन तोंडावर काँग्रेस पक्षाला सोडचिट्ठी देऊन एमआयएम पक्षात प्रवेश केलेल्या माजी महापौर, उपमहापौरांसह माजी नगरसेवक अशा एकुण २० जणांना पहिल्याच यादीत उमेदवारी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष माजी खा. इम्तियाज जलील यांनी जाहीर केली आहे.
काँग्रेस पक्षामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेच्या राजकारणात सहभागी असलेल्या माजी महापौर, उपमहापौरसह १० माजी नगरसेवकांनी एमआयएम पक्षामध्ये काही दिवसापूर्वी प्रवेश केला आहे. एमआयएमची पहिली यादी जाहीर झाली असून प्रभाग क्र. ११ हैदरबागमधून माजी उपमहापौरमहमद मसुद अहेमदखान, रशिया बेगम अब्दुल हबीब बागवान, सय्यद फैसुद्दीन सय्यद वलियोद्दिन, सायमा खान महमद खान यांना तर प्रभाग क्र. १२ उमर कॉलनी मधून अब्दुल रशिद अब्दुल गणी, बेबी शाहिस्ता महम्मद सलमान खान, कमर सुलतानाबी मिर्झा अनवर बेग, मोहम्मद अल्ताफ मोहम्मद युसुफ यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. प्रभाग क्र. १३ चौफाळामधून अब्दुल लतिफ अब्दुल माजीद, अश्विनी दशरथ धोंगडे, सय्यद मुजीब सय्यद मुख्तार, मारियम सानिया अब्दुल रफिक यांना तर प्रभाग क्र. १४ होळीमधून रेहाना बेगम चाँदपाशा कुरेशी, शमीम बेगम अब्दुल हफिज बागवान, शमीम अब्दुल्ला, हस्सेकरस्वाती नरसिंगराव यांना उमेदवारी मिळाली आहे. भाग्यनगरमधून प्रज्ञा बाबासाहेब सुर्यवंशी, शफी मुस्कान शेख, हजरा बेगम अब्दुल बासीत, मुफ्ती अशरअली खान अजरअली खान आदींना उमेदवारी देण्यात आली आहे.
प्रभाग क्र. ११,१२,१३,१४हा मुस्लिम बहुल भाग प्रभाग आहे. येथून काँग्रेस पक्षाचे आजपर्यंत प्राबल्य राहिले आहे. परंतू दिग्गज असणाऱ्या नेत्यांनी एमआयएम पक्षामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे २०१२ मध्ये या प्रभागामधून १२ नगसेवक एमआयएमचे निवडून आले होते
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis