बीडमधील सावंतवाडी फाट्याजवळ बस आणि दुचाकीचा अपघात, एकाचा मृत्यू
बीड, 29 डिसेंबर (हिं.स.)एसटी बस-दुचाकीची समोरासमोर घडक होऊन दुचाकीस्वार जागीच ठार झाला. तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना नेकनूर-केज मार्गावर नेकनूरपासून जवळच असलेल्या सावंतवाडी फाट्याजवळ घडली. किशोर निर्मळ (रा. नेकनूर) असे अपघातात मृत दुचाकीस्
बीडमधील सावंतवाडी फाट्याजवळ बस आणि दुचाकीचा अपघात, एकाचा मृत्यू


बीड, 29 डिसेंबर (हिं.स.)एसटी बस-दुचाकीची समोरासमोर घडक होऊन दुचाकीस्वार जागीच ठार झाला. तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना नेकनूर-केज मार्गावर नेकनूरपासून जवळच असलेल्या सावंतवाडी फाट्याजवळ घडली.

किशोर निर्मळ (रा. नेकनूर) असे अपघातात मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. किशोर निर्मळ नेकनूर येथून येळंबकडे दुचाकीवरून (एमएच ४४ एडी ३६६६) ने जात होते. समोरून येणाऱ्या बस क्रमांक(एमएच २० बीएल ४०५२) ने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात किशोर निर्मळ यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह नेकनूर कुटीर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. तर अन्य एका जखमीला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

ही बस नांदेडहून पुण्याला चालली होती. बसमध्ये ३० ते ३५ प्रवासी होते. किशोर निर्मळ हे शेती करून आपली उपजीविका भागवत होते. त्यांना दोन मुले आहेत. एक पुणे येथे खासगी कंपनीत तर दुसरा बीड येथे काम करत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande