
छत्रपती संभाजीनगर, 29 डिसेंबर (हिं.स.)दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे बंधू प्रकाश महाजन यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर अलीकडेच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला. प्रकाश महाजन यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करताच त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.
शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या प्रवक्ते पदी आपली नियुक्ती करण्यात येत आहे. सदर नियुक्तीचा कालावधी एक वर्षाचा असेल. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण याचा आपण सक्रीयपणे प्रचार आणि प्रसार कराल तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास आहे, असे पत्र देण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis