परभणी : पुंगळा येथील निराधार महिलेस शेळी–करडू भेट
परभणी, 29 डिसेंबर (हिं.स.)। होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएआरसी), परभणी संस्थेच्या वतीने जिंतूर तालुक्यातील पुंगळा येथील एका निराधार विधवा महिलेस उदरनिर्वाहाचे साधन म्हणून शेळी व करडू भेट देण्यात आले. यासोबतच संबंधित कुटुंबास संसारो
Q


परभणी, 29 डिसेंबर (हिं.स.)।

होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएआरसी), परभणी संस्थेच्या वतीने जिंतूर तालुक्यातील पुंगळा येथील एका निराधार विधवा महिलेस उदरनिर्वाहाचे साधन म्हणून शेळी व करडू भेट देण्यात आले.

यासोबतच संबंधित कुटुंबास संसारोपयोगी भांडे साहित्य, जीवनावश्यक किराणा तसेच तीन अनाथ बालिकांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारण्यात आले.

पतीच्या निधनानंतर अत्यंत बिकट परिस्थितीत जीवन जगणाऱ्या अर्चना पुरी यांच्या कुटुंबाची परिस्थिती लक्षात घेऊन हा मदतीचा उपक्रम राबविण्यात आला. कुटुंबाकडे स्थिर उत्पन्नाचे कोणतेही साधन नसून दहा बाय दहाच्या पत्र्याच्या खोलीत राहून शेतमजुरीवर त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे. त्यांच्या तीन मुली अनुक्रमे इयत्ता सहावी, तिसरी व पहिलीमध्ये शिक्षण घेत असून आर्थिक अडचणींमुळे शिक्षणावरही संकट आले होते.

ही बाब जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुंगळाचे शिक्षक प्रकाश डूबे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने कुटुंबास भेट देऊन त्यांची व्यथा जाणून घेतली व एचएआरसी संस्थेकडे मदतीसाठी प्रस्ताव मांडला.

त्यानुसार संस्थेने त्वरित निर्णय घेत कुटुंबास महिनाभर पुरेल इतके किराणा साहित्य, विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट तसेच उदरनिर्वाहासाठी शेळी व करडू भेट दिली .

एचएआरसी संस्थेचे अध्यक्ष डॉ. पवन चांडक, शिक्षक प्रकाश डूबे, रवि चिद्रवार, रामप्रसाद उपाध्ये,संतोष बारबिंडे, सचिन हजारे, विष्णू जगताप आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande