पक्षनिर्णयाचा सन्मान राखत अजिंक्य फरांदे यांची उमेदवारीतून माघार
नाशिक, 29 डिसेंबर (हिं.स.)। भारतीय जनता पक्षाने यंदाच्या निवडणुकीत आमदार, खासदार वा मंत्र्यांच्या पाल्यांना प्रथमच उमेदवारी न देण्याचा घेतलेला निर्णय शिरसावंद्य असून, त्या निर्णयाचा सन्मान राखत प्रभाग क्रमांक ७ मधून संभाव्य उमेदवारी मागे घेत असल्य
पक्षनिर्णयाचा सन्मान राखत अजिंक्य फरांदे यांची उमेदवारीतून माघार


नाशिक, 29 डिसेंबर (हिं.स.)।

भारतीय जनता पक्षाने यंदाच्या निवडणुकीत आमदार, खासदार वा मंत्र्यांच्या पाल्यांना प्रथमच उमेदवारी न देण्याचा घेतलेला निर्णय शिरसावंद्य असून, त्या निर्णयाचा सन्मान राखत प्रभाग क्रमांक ७ मधून संभाव्य उमेदवारी मागे घेत असल्याची घोषणा अजिंक्य देवयानी सुहास फरांदे यांनी केली आहे.

या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात अजिंक्य फरांदे म्हणाले की, भारतीय जनता पार्टीत सर्वप्रथम राष्ट्र त्यानंतर पक्ष त्यानंतर मी अशी भूमिका असते त्यामुळे पक्षाचा आदेश श्रेष्ठ मानून आपण नम्रपणे संभाव्य उमेदवारी मागे घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

फरांदे कुटुंबीय गेल्या चार दशकांहून अधिक काळापासून भारतीय जनता पक्षाच्या संघटन वाढीसाठी सातत्याने कार्यरत असून, पक्षाशी एकनिष्ठ राहण्याची परंपरा आजही कायम असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रचाराच्या प्रारंभिक टप्प्यात प्रभाग क्रमांक ७ मधील नागरिक, कार्यकर्ते, ज्येष्ठ व युवा मतदारांकडून मिळालेला विश्वास, प्रेम आणि प्रोत्साहन हीच आपली खरी सार्वजनिक संपत्ती असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

यावेळी नगरसेवक होण्याची संधी मिळाली नसली, तरी प्रभागातील विकासकामे, मूलभूत समस्या आणि सामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी पूर्वीप्रमाणेच निष्ठेने आणि जबाबदारीने कार्य करत राहण्याचा मन:पूर्वक शब्द त्यांनी दिला. प्रभाग क्रमांक ७ हा आपल्या कुटुंबासारखा असून, येथील प्रत्येक नागरिकाच्या विश्वासाची जाणीव मनात ठेवून पुढील वाटचाल सुरू राहील, असेही त्यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande