
परभणी, 29 डिसेंबर (हिं.स.)।
शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक करीता शहरातील एकुण १४६ इमारतींमध्ये ३४१ बुथ तयार करण्यात आले आहेत. या बुथवर राखीव कर्मचा-यांसह एकुण १ हजार ८०० मतदान केंद्राध्यक्ष व मतदान केंद्र अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. नियुक्त कर्मचा-यांचे ५ जानेवारी २०२६ रोजी पहिले प्रशिक्षण तर १० जानेवारी २०२६ रोजी दुसरे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.पाच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या प्रभागातील मतदान केंद्रवारील मतदान केद्रांध्यक्ष व मतदान केंद्र यांचे प्रशिक्षणासाठी बी. रघुनाथ सभागृह, कल्याण मंडपम् व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथील ऑडोटोरीयम हॉल ही ठिकाणे निश्चीत करण्यात आली आहेत. सर्व अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षणास उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे.तसचे प्रभाग क्रमांक १,२,७ करीता १५ झोनल अधिकारी, प्रभाग क्रमांग ३,४,५, ६ करीता १५ झोनल अधिकारी, प्रभाक क्रमांक ८,९,१४ करीता १६ झोनल अधिकारी, प्रभाग क्रमांक १०, ११, १३ करीता १३ झोनल अधिकारी, प्रभाक क्रमांक १२, १५, १६ करीता १५ झोनल अधिकारी, मनुष्यबळ कक्षाकरीता ५ झोनल अधिकारी असे एकुण ७९ झोनल अधिकारी नियुक्त करण्यात आलेले आहेत.निवडणूक कामी नियुक्त अधिकारी, कर्मचा-यांना रुजू होणे, प्रशिक्षणास उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. निवडणूक कामी रूजू होणा-या, कर्तव्यात हयगय, टाळाटाळ, कसूर करणा-या अधिकारी, कर्मचारी यांच्यावर लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५० चे कलम २९ व ३० तसेच लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ चे कलम १३४(ब)नुसार कारवाई करण्यात येईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis