
पुणे, 29 डिसेंबर (हिं.स.)।ग्रामीणभागातील बहुतांशी प्राथमिक व माध्यमिक शाळाना ग्रामपंचायत वित्तीय फंडातून किंवा लोकवर्गणीतून शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही बसवले आहेत. मात्र, बहुतांशी शाळेतील सीसीटीव्ही एकतर कायम बंद असतात किंवा सायंकाळी पाचनंतर बंद केले जातात, अशी धक्कादायक माहित एका पाहणी अहवालात उघड झाली आहे.शिरूर तालुक्यातील ग््राामीण भागातील प्राथमिक शाळा व भाग शाळा या मोठ्या प्रमाणात शेतात किंवा शेताजवळ आहेत. बिबटप्रवण क्षेत्र म्हणून हा परिसर ओळखला जातो. शाळा परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी स्थानिक नागरिक मुलांच्या सुरक्षेसाठी पदरमोड करून सीसीटीव्ही बसवतात. तेच सीसीटीव्ही अनेक शाळांमध्ये काही महिन्यांपासून बंद असल्याचे धक्कादायक महिती पुढे आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु