
बीड, 29 डिसेंबर (हिं.स.)इयत्ता नववीच्या वर्गात शिकत असलेल्या १४ वर्षीय मुलीने घरातील सीलिंग फॅनला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तांबवा (ता. केज) येथे घडली. तिने आत्महत्या का केली याचे कारण स्पष्ट झाले नव्हते. स्वामी विवेकानंद विद्या मंदिर या शाळेत इयत्ता ९ वीच्या वर्गात शिक्षण घेत होती. घरच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या रूमचा दरवाजा आतूऐन बंद केला. सीलिंग फॅनला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सुमारास उघडकीस आले. पोलिस निरीक्षक स्वप्निल उनवणे यांच्या आदेशावरून सहायक पोलिस निरीक्षक संदीप मांजरमे, फौजदार उमेश निकम यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिला.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis