
लातूर, 29 डिसेंबर (हिं.स.)।अहमदपूर नगरपालिकेच्या नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा टायगर ग्रुपच्या वतीने जंगी सत्कार नगरपालिका निवडणुकीत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांचा टायगर ग्रुप अहमदपूर च्या वतीने विशेष गौरव करण्यात आला. टायगर ग्रुपचे अध्यक्ष भागवत दादा पाटील यांच्या हस्ते हा सत्कार सोहळा पार पडला.
अहमदपूर येथील देशमुख कॉम्प्लेक्समधील टायगर ग्रुपच्या मुख्य कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लोकशाहीच्या उत्सवात जनतेचा कौल मिळवून विजयी झालेल्या लोकप्रतिनिधींचे अभिनंदन करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्ष स्वप्निल व्हत्ते यांच्यासह खालील नगरसेवकांचा यथोचित सत्कार करण्यात आला: शेख रिजिया, राहुल शिवपुजे, शाहूबाई कांबळे, शेख सदाम. भाग्यश्री बारमाळे, हुसेन मनियार, उषा देवकते, एड. निखिल कासनाळे. मीनाक्षी सिंगडे, एड. अजिंक्य चामे, कोमल हलसे, संदीप चौधरी. सावन कुमार कदम, शहाणाजबी बागवान, शिल्पा तोगरे, शेख आयाज. एड. किशोर कोरे, सलमा सय्यद, शहनाजबेगम बागवान, जहूर हबीब. प्रतीक रेड्डी, सुलोचना भोसले, प्रदीप कांबळे, शुभांगी रेड्डी आणि अर्चना मजगे. या सोहळ्याप्रसंगी टायगर ग्रुपचे अध्यक्ष भागवत दादा पाटील यांच्यासोबत अजय कदम, भगतसिंग बावरे, योगेश माने यांच्यासह टायगर ग्रुपचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना भागवत दादा पाटील यांनी नवनिर्वाचित प्रतिनिधींना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आणि शहराच्या विकासासाठी सर्व लोकप्रतिनिधी जोमाने कार्य करतील, असा विश्वास व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis