
पुणे, 29 डिसेंबर (हिं.स.)।
विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याला तीनच दिवस राहिल्याने कार्यक्रमस्थळी जय्यद तयारी सुरू आहे. रॅम्प बांधण्याचे, फुलांची सजावट करण्याच्या कामाला वेग आला आहे. यंदा प्रवेशासाठी एक व बाहेर पडण्यासाठी वाढीव एक रॅम्स वाढविण्यात आल्या असून अनुयायींना अभिवादन करण्यासाठी त्रास होणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे.स्तंभाच्या मागे ३०० पेक्षा अधिक बुक स्टॉल उभारण्याचे काम सुरू आहे. तर दुसऱ्या बाजूला प्रशासनासाठी कक्ष, माध्यमासाठी कक्ष, इतर कक्ष उभारण्याच्या कामाला गती आली आहे. त्यामागे पक्षांचे काही सभा मंडप उभारणीचे काम सुरू आहे. अनेक पार्किंगच्या सुविधा दोन्ही बाजूला निर्माण करण्यात आल्या असून पी एम पी एल थांबेही तयार करण्यात आले आहेत. लोणीकंद पोलिसांच्या वतीने स्तंभ परिसरात कायम स्वरुपी २५ सी सी टीव्ही कार्यान्वित करण्यात आले आहेत. शौर्य दिनाच्या कार्यक्रमाला गालबोट लागणार नाही याची काळजी घ्या असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु