
परभणी, 29 डिसेंबर (हिं.स.)।
बांगलादेशात गेल्या तीन वर्षांपासून हिंदू समाजावर होत असलेल्या कथित अत्याचार, हिंसाचार व जाळपोळीच्या घटनांच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळील उपोषण मैदानात जोरदार आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात विश्व हिंदू परिषद महाराष्ट्र क्षेत्र सहमंत्री अंनत पांडे, जिल्हाध्यक्ष सुरेंद्र शहाणे, जिल्हा मंत्री राजकुमार भांबरे, ज्ञानोबा शिंदे, मनोज काबरा, सुनील रामपूरकर, अभिजित कुलकर्णी, कमलकिशोर अग्रवाल, रितेश जैन, बबलू टाक वैभव अससोळेकर, राजेश्वर पारवेकर, ओम मुदिराज, अनील देशमुख, प्रकाश कुलकर्णी आदींचा सहभाग होता.
बांगलादेशात मागील काही दिवसांपासून हिंदू समाजाच्या घरांची तोडफोड, जाळपोळ तसेच हिंदू माता-भगिनींवर अत्याचाराच्या घटना घडत असल्याचा आरोप संघटनांच्या वतीने करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर या हिंसाचाराचा निषेध नोंदविण्यासाठी तसेच बांगलादेशातील हिंदू बांधवांच्या समर्थनार्थ हे आंदोलन करण्यात आल्याचे विश्व हिंदू परिषद व बजरंग दलच्या वतीने सांगण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis