परभणी - ताडकळस येथे तलवार बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल
परभणी, 30 डिसेंबर, (हिं.स.)। ताडकळस येथील मोंढा परीसरात तलवार घेऊन फिरत असल्याची माहिती ताडकळस पोलीसांना मिळताच मोंढा परिसरात आरोपीला पकडून ताडकळस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत अधिक माहिती अशी की, आरोपी सुदर्शन बाळासाहेब आवरगं
ताडकळस येथे तलवार बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल


परभणी, 30 डिसेंबर, (हिं.स.)। ताडकळस येथील मोंढा परीसरात तलवार घेऊन फिरत असल्याची माहिती ताडकळस पोलीसांना मिळताच मोंढा परिसरात आरोपीला पकडून ताडकळस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की, आरोपी सुदर्शन बाळासाहेब आवरगंड(वय २३)रा. माखणी ता. पुर्णा ताडकळस येथील मोंढा परीसरात एक स्टिल रंगाची मुठ व स्टिल रंगाचे पाते असलेली तलवार तसेच लाल रंगाची मॅन ज्यावर बारीक व मोठे पांढरे व सोनेरी रंगाचे मन्याची डिजाइन असलेली, मॅनाचे टोकापासुन ते मुठाचे मागील टोकापर्याताची एकुन लांबी अदाजे ३४.५ इंच असलेली व जीचे पाते टोकापासुन मुठापर्यंत लांबी एकुन अंदाजे ३१ इंच लांबीची, मुठाची लांबी अंदाजे ७ इंच व पात्याची लांबी अंदाजे २४ इंच लांबीची व पात्याची मद्यभागी रुंदी अंदाजे १ इंच असलेली वर्णनाचा मुद्देमाल जप्त केला.आरोपीने जिल्हाधिकारी यांच्या शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन करुन बेकायदेशीर प्रतिबंधीत शस्त्र तलवार विनापरवाना बाळगल्याप्रकरणी पोलीस अंमलदार राहुल सत्यभान वडमारे यांच्या फिर्यादीवरून ताडकळस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास ताडकळसचे ठाणेदार गजानन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार मनोहर पडोळे हे पुढील तपास करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande