
अकोला, 30 डिसेंबर (हिं.स.)। भाजपमध्ये पक्षविरोधी कारवायांमुळे कारवाई करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांची घरवापसी सुरू असून, यामुळे पक्षाची संघटनात्मक ताकद आणि नेतृत्वाची दूरदृष्टी पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. काल ज्येष्ठ नगरसेवक हरीश अलीमचंदानी यांची भाजपमध्ये यशस्वी घरवापसी झाली, तर आज गृहमंत्री रणजीत पाटील यांचे पुतणे आशिष पवित्रकार यांनी सुद्धा भाजप आमदार रणधीर सावरकर यांची भेट घेतली आहे. यासोबतच भाजपकडून कारवाई करण्यात आलेले गिरीश गोखले , प्रफुल हातवणे यांनाही भाजपने पुन्हा प्रवेश देत समेटाचा मोठा संदेश दिला आहे.विशेष म्हणजे या तिन्ही नेत्यांनी एकत्र येत तिसरी आघाडी उभारली होती. मात्र भाजपच्या सकारात्मक नेतृत्वशैली, संघटन कौशल्य आणि समन्वयाच्या भूमिकेमुळे या आघाडीचा आता पूर्णतः सूर्यास्त झाला आहे. भाजपने मतभेदांना संपवून सर्वांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणत पक्षाची एकजूट अधिक मजबूत केली आहे.तर उबाठाच्या मंजुषा शेळके यांनी पक्षाला राम राम ठोकत भाजपमध्ये प्रवेश मिळवून उमेदवारी मिळवली आहे.
घरवापसी झालेल्या तिन्ही नेत्यांपैकी हरीश अलीमचंदानी यांना पुन्हा भाजपतर्फे उमेदवारी देण्यात आली असून, कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. हा निर्णय भाजप कार्यकर्त्यांमध्ये विश्वास वाढवणारा ठरला असून, निष्ठा आणि संघटनेला महत्त्व देणारा पक्ष म्हणून भाजपची ओळख अधिक ठळक झाली आहे.एकंदरीत भाजपने बंडखोरीला संयमाने आणि राजकीय प्रगल्भतेने सामोरे जात सर्व नाराजांना एकत्र आणण्यात मोठे यश मिळवले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे