बाळापूर - विहिरीत अडकलेल्या निलगायीला जीवदान
अकोला, 30 डिसेंबर (हिं.स.)। बाळापुर तालुक्यातील देगाव गावात मंगळवारी 30 डिसेंबर रोजी एक मोठी व वजनदार नीलगाय विहिरीत पडल्याची घटना घडली. सुमारे दोनशे किलो वजनाचा हा नीलगाय नर अत्यंत धोकादायक अवस्थेत विहिरीत अडकला होता. ही विहीर मोठ्या दगडांची अस
बाळापूर - विहिरीत अडकलेल्या निलगायीला जीवदान


अकोला, 30 डिसेंबर (हिं.स.)। बाळापुर तालुक्यातील देगाव गावात मंगळवारी 30 डिसेंबर रोजी एक मोठी व वजनदार नीलगाय विहिरीत पडल्याची घटना घडली. सुमारे दोनशे किलो वजनाचा हा नीलगाय नर अत्यंत धोकादायक अवस्थेत विहिरीत अडकला होता. ही विहीर मोठ्या दगडांची असून त्यातील दगड सतत कोसळत असल्याने रेस्क्यू कार्य अधिकच जोखमीचे ठरले होते.

मात्र, अशा कठीण परिस्थितीतही अकोला वनविभागाच्या रेस्क्यू टीमने तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर नीलगाय नराला सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळवले. विहिरीतून बाहेर काढताच नीलगाय नर पळून गेल्याने उपस्थित ग्रामस्थांसह संपूर्ण रेस्क्यू टीममध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.या यशस्वी रेस्क्यू कारवाईसाठी आरएफओ विश्वास थोरात व वनपाल गजानन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करण्यात आले. वनविभागाचे वनरक्षक तथा शूटर संघपाल तायडे यांनी नीलगाय नराला योग्य ठिकाणी अचूक डार्ट मारून तात्पुरती बेहोशी दिली, जी या रेस्क्यूसाठी अत्यंत आवश्यक होती.तसेच मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे यांचा योग्य निर्णयही रेस्क्यूसाठी मोलाचा ठरला.या मोहिमेत यशपाल इंगोले (चालक), आलासिंह राठोड (चालक), तुषार आवारे, डॉ. प्रविण पवार यांच्यासह संपूर्ण रेस्क्यू टीमने जीव धोक्यात घालून मेहनत घेतली.गावकऱ्यांमधून रवि गावंडे, सुरेंद्र गावंडे, गजानन ढोरे व गौरव कोगदे यांनी देखील मोलाची मदत केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande