पाथरीत नगराध्यक्ष आसेफ खान यांनी घेतला पदभार
परभणी, 30 डिसेंबर (हिं.स.) पाथरी नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेने नगराध्यक्षासह ९ नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी प्रचंड मताधिक्य घेत विजय मिळवला. पाथरीचे नगराध्यक्ष आसेफ खान यांचा पदग्रहण सोहळा पाथरी नगरपरिषदेत माझ्या व जनतेच्या उपस्थितीत प्रचंड उत्साहप
नेते सईद खान यांच्या उपस्थितीत आसेफ खान यांनी घेतला  पदभार


परभणी, 30 डिसेंबर (हिं.स.) पाथरी नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेने नगराध्यक्षासह ९ नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी प्रचंड मताधिक्य घेत विजय मिळवला. पाथरीचे नगराध्यक्ष आसेफ खान यांचा पदग्रहण सोहळा पाथरी नगरपरिषदेत माझ्या व जनतेच्या उपस्थितीत प्रचंड उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. पाथरीच्या जनतेने मोठ्या विश्वासाने आपल्याला निवडून दिले आहे. त्यामुळे विजयाचे यश डोक्यात न जाऊ देता पुढील पाच वर्षे अविरत लोकसेवा करा, जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य द्या आणि विकासाची कामे करा, असा संदेश दिला यावेळी विजयी उमेदवारांना दिला. तसेच पाथरीच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असा विश्वास व्यक्त करत लोकनियुक्त नगराध्यक्ष आसेफ भैय्या खान व नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी शिवसेना पक्षाचे ज्येष्ठ नेते, यांच्यासह सर्व नगरसेवक / नगरसेविका, शिवसेना पक्षाचे पदाधिकारी,पाथरीचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.आज तब्बल ३५ वर्षांनंतर आज पाथरी नगरपालिकेवर शिवसेनेचा झेडा फडकला. ---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande