
छत्रपती संभाजीनगर, 30 डिसेंबर (हिं.स.)। शेतकरी व सर्वसामान्य नागरिक हे शासनाच्या योजनांचे केंद्रबिंदू असून त्यांच्या अडचणी दूर करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे, असे भाजप आमदार प्रशांत बंब यांनी सांगितले
गंगापूर व खुलताबाद तालुक्यातील प्रधानमंत्री सूर्य घर योजना, कुसुम व मागेल त्याला सौर पंप योजनेतील लाभार्थ्यांना येणाऱ्या समस्यांबाबत महावितरण मुख्य अभियंता यांच्या दालनात आढावा बैठकीचे आयोजन केले होते.
बैठकीत अर्ज मंजुरीतील विलंब, अनुदान, सोलार पंप व रूफटॉप बसविण्यास होणारा उशीर तसेच तांत्रिक अडचणी यावर चर्चा करण्यात आली. प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करून पात्र लाभार्थ्यांना लवकर लाभ देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना आमदार बंब यांनी दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis