
छत्रपती संभाजीनगर, 30 डिसेंबर (हिं.स.)। वैजापूर नगरपालिकेचे अध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी यांच्यासह भाजप तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) च्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा आमदार प्रशांत बंब यांच्या निवासस्थानी कुटुंबियांच्या उपस्थितीत स्नेहपूर्ण सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉ. बन्सीलाल बंब, आई सौ. कांचन बंब, तसेच संदेश बंब यांची पत्नी सौ. शीतल बंब व चिरंजीव आगम बंब उपस्थित होते.
लोकशाही प्रक्रियेत जनतेचा विश्वास संपादन करून निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
वैजापूरच्या सर्वांगीण विकासासाठी हे नेतृत्व निश्चितच महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis