

नाशिक, 30 डिसेंबर, (हिं.स.)महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपामध्ये जोरदार गोंधळ झाला आहे. सुमारे एक तासापेक्षा अधिक काळ मुंबई आग्रा महामार्गावरती या एबी फॉर्म घेऊन जाणाऱ्या गाडीचा इच्छुक उमेदवार पाठलाग करत असल्याचे समोर आले आहे.
या ठिकाणी अक्षरशा एबी फॉर्म मिळवण्यासाठी हल्लाबोल झाल्याची घटना देखील झाली आहे. अखेर पोलीस बंदोबस्तामध्ये सत्ताधारी भाजपला अधिकृत उमेदवारीसाठी अर्ज नेत्यांना मदत घ्यावी लागली. या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे .
महानगरपालिका निवडणुकीसाठी नासिक मध्ये अखेर शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करूनही महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातील असलेल्या संघर्ष हा सुरूच होता पण महाविकास आघाडी ही जमली त्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सर्वात जास्त जागा मिळाल्या तर जागेच्या वाटणीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कमी जागा मिळाल्या परंतु त्यांची विकासासाठी ही झाली तर दुसरीकडे मात्र महायुती होऊ शकली नाही भाजपने सुरुवातीपासूनच सुरू ठेवलेल्या भूमिकेमुळे मित्रपक्ष असलेला शिवसेना शिंदे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष यांच्यामध्ये एकमत होऊ शकलं नाही आणि शेवटच्या क्षणापर्यंत हा गोंधळ कायम राहिला त्यामुळे मित्रपक्ष असलेल्या शिवसेना शिंदे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष यांनी आपल्या दोघांमध्येच युती करून महानगरपालिका निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला त्या दृष्टिकोनातून त्यांच्या बैठका झाल्या आणि त्या बैठकांमध्ये जागावाटप करून त्यांची स्वतंत्र युती तयार करण्यात आली त्यामुळे आता महानगरपालिका निवडणुकीसाठी नाशिक मध्ये तिरंगी लढत होणार हे आता स्पष्ट झालेला आहे यांच्याबरोबर ला छोटे पक्ष आणि अपक्ष देखील निवडणूक रिंगणात उतरल्यामुळे एका वॉर्डामध्ये सर्वसाधारण सात ते आठ उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
हे सर्व घडत असताना मात्र शेवटच्या दिवशी अखेर भाजपामध्ये अपेक्षेप्रमाणे एबी फॉर्म मिळवण्यासाठी मोठा गोंधळ बघायला मिळाला पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी एबी फॉर्म चे वाटप करण्यासाठी पक्षाचे शहराध्यक्ष सुनील केदार आणि आमदार राहुल ढिकले यांच्यावर ती जबाबदारी सोपवली होती त्यांनी नेहमीप्रमाणे एका फार्म हाऊस वर हे उमेदवारांना एबी फॉर्म वाटण्याचा निर्णय घेतला आणि त्याचे निरोप दिले पण याबाबतची माहिती ज्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यांना कळाली त्यानंतर ज्या गाडीमध्ये आमदार ढिकले आणि अध्यक्ष केदार हे होते ती गाडी नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार सीमा हिरे यांनी रस्त्यामध्ये थांबून त्यामध्ये प्रवेश केला त्या देखील या सर्व प्रक्रियेमध्ये सहभागी झाल्या तर ज्यांना उमेदवारी मिळण्याची आशा होती अशांनी या गाडीचा सुमारे एक तास मुंबई आग्रा महामार्गावरती पाठलाग केला आणि एक तास या गाडीच्या चालकाने त्यांना गुंगरा दिला पण नियोजित स्थळी पोहोचल्यानंतर या ठिकाणी इच्छुकांनी मोठा गोंधळ घातला या ठिकाणी दरवाजाला लाथा मारल्या मोठा संताप व्यक्त करण्यात आला आणि शेवटी या फार्म हाऊस चे गेट तोडून सर्वांनी आत मध्ये प्रवेश केला या ठिकाणी हल्ला करून एबी फॉर्म पळवा पळवी ची घटना घडली त्यानंतर तातडीने पोलिसांना या ठिकाणी पाचरण करण्यात आले. आणि त्यानंतर या ठिकाणी भाजपच्या वतीने एबी फॉर्म चे वाटप करण्यात आले. दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर या ठिकाणी भाजपाचे नेते आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन देखील दाखल झाले त्यांनी देखील या ठिकाणी सगळ्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला.
यामुळे भाजप इच्छुकांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते त्यांनी संताप व्यक्त केला माजी नगरसेविका असलेल्या अहिरे यांचे पती कैलास अहिरे यांनी मोठ्या प्रमाणावर ती भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आमदार सीमा हिरे, राहुल ढिकले , शहराध्यक्ष सुनील केदार, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जाणून-बुजून निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावल्याच्या आरोप केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV