धुळ्यात भाजपा ६३ जागांवर स्वबळावर लढणार; शेवटच्या क्षणी एबीफार्मचे वाटप
धुळे , 30 डिसेंबर (हिं.स.) भारतीय जनता पक्षाने धुळे महापालिकेच्या ७४ पैकी ६३ जागा स्वबळावर लढविण्याचा निर्णय केला असून काल रात्रीपासूनच निश्‍चित उमेदवारांना एबीफार्मचे वाटप केले जात आहे. ३१ पुरूष तर ३२ महिला उमेदवार निश्‍चित करून त्यांना भारतीय जन
धुळ्यात भाजपा ६३ जागांवर स्वबळावर लढणार; शेवटच्या क्षणी एबीफार्मचे वाटप


धुळे , 30 डिसेंबर (हिं.स.) भारतीय जनता पक्षाने धुळे महापालिकेच्या ७४ पैकी ६३ जागा स्वबळावर लढविण्याचा निर्णय केला असून काल रात्रीपासूनच निश्‍चित उमेदवारांना एबीफार्मचे वाटप केले जात आहे. ३१ पुरूष तर ३२ महिला उमेदवार निश्‍चित करून त्यांना भारतीय जनता पक्षाचे एबी एबीफार्म देण्यात येत असल्याची माहिती भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी दिली आहे.

उमेदवारी घोषणेत पाळली गुप्तता धुळे महापालिका निवडणूकीसाठी सर्वात जास्त ५५० इच्छुक उमेदवार भाजपाकडे होते. त्यामुळे उमेदवारीसाठी प्रचंड रस्सीखेच भारतीय जनता पक्षामध्ये सुरू होती. पक्षाकडून उमेदवार निश्‍चित करून घोषणा करण्यात कमालिची गुप्तता पाळण्यात आली. अखेरच्या क्षणापयरत भाजपाची उमेदवारी कोणाला हे अनेक प्रभागांमध्ये स्पष्ट झालेले नाही. मात्र संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी आणि आपल्या उमेदवारांसमोर विरोधीकांनी प्रबळ उमेदवार देवू नये म्हणून भाजपाकडून सुरू असलेल्या या खेळीचा हवा तसा परिणाम दिसतो काय हे अर्ज छाननी प्रक्रियेनंतरच स्पष्ट होणार असून प्रमुख लढतींचे चित्र माघारीनंतर स्पष्ट होणार आहे. ६३ जागांवर उमेदवारी निश्‍चित दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीने धुळे महापालिकेच्या ७४ पैकी ६३ जागा स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande