
नंदूरबार, 30 डिसेंबर (हिं.स.) राज्यात प्रथमच एकाच पक्षाचे नगराध्यक्षांसह सर्व २६ नगरसेवक बिनविरोध होण्याचा मान मिळालेल्या दोंडाईचा नगरपालिकेच्या बिनविरोध लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.नयनकुंवरताई रावल यांच्यासह सर्व २६ बिनविरोध नगरसेवकांनी आज पालिकेच्या सभागृहात जावून आपला पदभार स्विकारला, यावेळी राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्हयाचे पालकमंत्री ना.जयकुमार रावल, लोकनेते सरकारसाहेब रावल, मंत्री रावल यांच्या सौभाग्यवती सुभद्रादेवी रावल, जिल्हा परीषदेच्या माजी अध्यक्षा सौ.धरती देवरे, माजी नगराध्यक्ष डॉ रविंद्र देशमुख,बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, भाजपाचे शहराध्यक्ष जितेंद्र गिरासे यांच्यासह भाजपाचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
पदभार स्विकारण्याआधी मंत्री रावल यांच्यासह नगराध्यक्षा नयनकुंवरताई रावल यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाला अभिवादन केले तेथून ढोलताश्यांच्या गजराज आणि फटाक्यांच्या आतिशबाजीत नगरपालिकेत प्रवेश केला. पालिकेने नवनिर्वाचित नगराध्यक्षांसह नगरसेवकांच्या स्वागताची मोठी जय्यत तयारी केली होती, पालिकेची इमारत पुष्पगुच्छांनी पुर्ण सजविण्यात आली होती. अध्यक्षांच्या दालनात जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून नगराध्यक्षांचे मंत्री जयकुमार रावल यांनी खुर्चीवर विराजमान केले.
यावेळी लोकनेते सरकारसाहेब रावल, मंत्री रावल यांच्या सौभाग्यवती सौ.सुभद्रादेवी रावल, जि.प.च्या माजी अध्यक्षा सौ. धरती देवरे, माजी नगराध्यक्ष डॉ रविंद्र देशमुख,नारायण पाटील, गटनेता निखील जाधव, शहराध्यक्ष जितेंद्र गिरासे, यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक मुकेश गणसिंग देवरे, कुकरेजा रविना महेशकुमार, सोनवणे सरलाबाई छोटू ,शेख शिबान अहमद रियाज अहमद, चव्हाण अक्षय वसंत ,बागवान सुपीयाबी मेहमुद, नगराळे कल्पनाबाई गोपाल आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर