कोरेगाव भीमा शौर्यदिनासाठी कडेकोट बंदोबस्त
पुणे, 30 डिसेंबर, (हिं.स.)। कोरेगाव भीमा येथे एक जानेवारी रोजी शौर्यदिनानिमित्त विजयस्तंभ अभिवादनासाठी मोठ्या प्रमाणावर अनुयायी येतात. या पार्श्वभूमीवर कोणतीही अनुचित घटना घडू नये, तसेच शांततेत कार्यक्रम पार पडावा यासाठी पुणे शहर पोलिसांकडून सर्वंक
bhima Koregoan news pune


पुणे, 30 डिसेंबर, (हिं.स.)। कोरेगाव भीमा येथे एक जानेवारी रोजी शौर्यदिनानिमित्त विजयस्तंभ अभिवादनासाठी मोठ्या प्रमाणावर अनुयायी येतात. या पार्श्वभूमीवर कोणतीही अनुचित घटना घडू नये, तसेच शांततेत कार्यक्रम पार पडावा यासाठी पुणे शहर पोलिसांकडून सर्वंकष तयारी करण्यात आली आहे. कोरेगाव भीमा परिसरात सुमारे साडेसात हजार पोलिस अधिकारी, कर्मचारी तैनात असतील, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी परिषदेत दिली.

विजयस्तंभ अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी सर्व नियोजन करण्यात आले आहे. वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. तसेच, २२ ठिकाणी वाहनतळ निश्चित करण्यात आले आहेत.कोरेगाव भीमा परिसरात शहर पोलिस दलातील सहा हजार पोलिस आणि बाहेर गावावरून बाराशे पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात असतील. तसेच, एक हजार होमगार्ड आणि राज्य राखीव दलाच्या तुकड्याही नेमण्यात आल्या आहेत. याशिवाय, येथील पोलिस टॉवर, ड्रोनद्वारे परिस्थितीवर देखरेख ठेवण्यात येणार आहे. चोरीचे प्रकार रोखण्यासाठी विशेष पोलिस पथके नेमण्यात आली आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande