
रत्नागिरी, 30 डिसेंबर, (हिं. स.) : पशुसंवर्धनविषयक किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ घेण्यासाठी दर शुक्रवारी (शुक्रवारी सुट्टी असल्यास गुरुवारी ) तालुका स्तरावर रत्नागिरी पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागात शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
दर शुक्रवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त पशुपालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन गटविकास अधिकारी चेतन शेळके व पशुधन विकास अधिकारी (विस्तार) डॉ. आदिती कसालकर यांनी केले आहे.
शिबिरामध्ये योजनेचा लाभ घेण्यासाठी २ फोटो, आधारकार्ड झेरॉक्स, रेशनकार्ड झेरॉक्स, ७/१२ व ८ अ उतारा, असेसमेंट उतारा ग्रामपंचायत नमुना नं. ८, बँक पासबुक झेरॉक्स, पशुधन असल्याचा दाखला, पॅनकार्ड झेरॉक्स इत्यादी आवश्यक कागदपत्रे घेऊन पंचायत समिती कार्यालयात उपस्थित राहावे. या योजनेची मुदत ३१ मार्च २०२६ पर्यंत आहे, असे सूचित करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी