चंद्रपूर - काँग्रेस पक्षातील गोंधळाने कार्यकर्ते संतापले
चंद्रपूर, 30 डिसेंबर (हिं.स.)।काँग्रेसच्या तिकीट वाटपात खासदार प्रतिभा धानोरकर यांचे एकतर्फी वर्चस्व राहिले आहे, तर वडेट्टीवार यांना समर्थकांना उमेदवारी मिळवून देण्यात अपयश आले आहे. काँग्रेस पक्षातील या गोंधळाने कार्यकर्ते चांगलेच संतापले आहेत. मा
चंद्रपूर - काँग्रेस पक्षातील गोंधळाने कार्यकर्ते संतापले


चंद्रपूर, 30 डिसेंबर (हिं.स.)।काँग्रेसच्या तिकीट वाटपात खासदार प्रतिभा धानोरकर यांचे एकतर्फी वर्चस्व राहिले आहे, तर वडेट्टीवार यांना समर्थकांना उमेदवारी मिळवून देण्यात अपयश आले आहे. काँग्रेस पक्षातील या गोंधळाने कार्यकर्ते चांगलेच संतापले आहेत.

मागील दोन दिवसांपासून काँग्रेसच्या उमेदवारीसाठी खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार विजय वडेट्टीवार, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांच्या बैठका अपक्ष आमदार सुधाकर अडबाले यांंच्या निवासस्थानी सुरू होत्या. सोमवारी मध्यरात्री सर्व १७ प्रभागातील ६६ उमेदवारांची अंतिम यादी तयार करण्यात आली. या यादीत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी अतिशय पध्दतशीरपणे आमदार विजय वडेट्टीवार समर्थक उमेदवारांचा पत्ता कट केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande