धुळे - निवडणुकीसाठी भाजपा विरोधात शिवसेना तर राष्ट्रवादीशी हातमिळवणी
धुळे , 30 डिसेंबर (हिं.स.) भारतीय जनता पक्षासोबत युतीची बोलणी फिस्कटल्यानंतर शिवसेना (शिंदेगट) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) यांच्यात युतीची बोलणी सुरू झाली आणि दोन्ही पक्षांनी सामंजस्याने एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. आज उमेदवारी दाख
धुळे - निवडणुकीसाठी भाजपा विरोधात शिवसेना तर राष्ट्रवादीशी हातमिळवणी


धुळे , 30 डिसेंबर (हिं.स.) भारतीय जनता पक्षासोबत युतीची बोलणी फिस्कटल्यानंतर शिवसेना (शिंदेगट) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) यांच्यात युतीची बोलणी सुरू झाली आणि दोन्ही पक्षांनी सामंजस्याने एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. आज उमेदवारी दाखल करण्याचा अखेरचा दिवस असल्याने आपआपल्या पक्षांकडून उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप करण्यात येत आहे. शिवसेना ३२ ते ३३ जागा लढवित असून राष्ट्रवादी कॉंग्रेस ने ४५ जागेवरील उमेदवारांना एबी फॉर्म दिले असल्याची माहिती दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे.

धुळे महापालिका निवडणूकीसाठी शिवसेना व भाजपाची एकत्र येण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून बोलणी सुरू होती. उमेदवारीचा अंतीम दिवस उजाळला तरी भाजपाकडून अपेक्षित जागा मिळत नसल्याने शिवसेनेच्या नेत्यांनी स्वबळावर लढण्याचा नारा दिला आणि भाजपशी बोलणी थांबविली. तर दुसरीकडे रात्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंगे्रसशी हातमिळवणी करण्याचा निर्णय घेवून आमदार मंजूळाताई गावित यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांशी बैठकही पार पडली. या बैठकीत दोन्ही पक्षांनी एकत्रपणे मनपा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती जिल्हा प्रमुख सतिष महाले यांनी दिली आहे. तसेच शिवसेनेकडून ३२ ते ३३ जागा लढविण्याचा निर्णय झाला असून आज सकाळपासून उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप करण्यात येत आहे असेही महाले यांनी सांगितले. मात्र नेमक्या कुठल्या प्रभागांमध्ये शिवसेनेकडून उमेदवार दिले जात आहेत, कोणत्या जागा राष्ट्रवादीला सोडण्यात आल्या आहेत याबद्दल स्पष्टीकरण मिळू शकले नाही. अर्ज छाननी प्रक्रियोनंतरच चित्र स्पष्ट होणार आहे. राष्ट्रवादीचे ३८ ते ४० जागांवर उमेदवार राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार पक्षातर्ङ्गे धुळे महापालिकेच्या ७४ पैकी ३८ ते ४० जागांवर उमेदवार दिले जात असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अनिल मुंदडा यांनी दिली आहे. राष्ट्रवादीवादी कॉंग्रेसचे निवडणूक प्रभारी आमदार अनिल भाईदास पाटील हे धुळ्यात येत असून शिवसेनेसोबत युती करण्याचा निर्णय झाला आहे. जागा वाटप तसेच युतीचा अधिकृत निर्णय त्यांच्या उपस्थितीत जाहिर केला जाणार आहे. आज उमेदवारी दाखल करण्याचा अखेरचा दिवस असल्याने आणि शिवसेनेची भाजप बरोबर युती फिस्कटल्यावर ते आमच्याकडे युतीसाठी बोलणी करायला आले. अखेरच्या टप्प्यात ही चर्चा होत असल्याने आता उमेवारांना एबी फॉर्म वाटप करून उमेदवारी दाखल करण्यावर आमचा भर आहे, असेही अनिल मुंदडा यांनी म्हटले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande