अचलपूर नगरपालिकेत नगराध्यक्ष रुपाली माथने यांचा ऐतिहासिक पदग्रहण सोहळा संपन्न
अमरावती, 30 डिसेंबर (हिं.स.) अचलपूर नगरपालिकेत नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ. रुपाली अभय माथने यांचा पदग्रहण समारंभ आज मंगळवारी अत्यंत उत्साहपूर्ण व ऐतिहासिक वातावरणात पार पडला. विधिवत पूजन करून नगराध्यक्षांनी अधिकृतपणे आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला.
अचलपूर नगरपालिकेत नगराध्यक्ष रुपाली अभय माथने यांचा ऐतिहासिक पदग्रहण सोहळा


अमरावती, 30 डिसेंबर (हिं.स.) अचलपूर नगरपालिकेत नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ. रुपाली अभय माथने यांचा पदग्रहण समारंभ आज मंगळवारी अत्यंत उत्साहपूर्ण व ऐतिहासिक वातावरणात पार पडला. विधिवत पूजन करून नगराध्यक्षांनी अधिकृतपणे आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. या सोहळ्याने अचलपूर नगरपालिकेच्या राजकीय व प्रशासकीय इतिहासात एक नवा अध्याय जोडला गेला.

या भव्य पदग्रहण समारंभास अचलपूरचे आमदार प्रवीण तायडे यांच्या हस्ते नगराध्यक्ष रुपाली माथने यांनी पदभार स्वीकारला. यावेळी नगरविकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या तीन ई-बाईकचे वाटप कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले, ज्यामुळे पर्यावरणपूरक आणि आधुनिक प्रशासनाचा संदेश देण्यात आला.या प्रसंगी निवडणूक प्रभारी विनोद वाघ, मेळघाट जिल्हा अध्यक्ष प्रभुदास भिलावेकर, जिल्हा उपाध्यक्ष सुधीर रसे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष तुषार खेरडे, जिल्हा सरचिटणीस नयना जोशी यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. तसेच अचलपूर-परतवाडा शहर व परिसरातील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पदग्रहणानंतर बोलताना नगराध्यक्ष सौ. रुपाली अभय माथने यांनी अचलपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत, नागरिकांचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी पारदर्शक, गतिमान व लोकाभिमुख प्रशासन देण्याचा निर्धार व्यक्त केला.आमदार प्रवीण तायडे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात नगरपालिकेच्या माध्यमातून शहराच्या पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा व विकासकामांना प्राधान्य दिले जाईल, असे आश्वासन दिले.संपूर्ण पदग्रहण सोहळा उत्साह, विश्वास आणि विकासाच्या संकल्पाने भारलेला असून, अचलपूर शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा दिवस ऐतिहासिक ठरल्याची भावना उपस्थितांमध्ये दिसून आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande