३१ डिसेंबरला खांदेरीदुर्ग विजय दिन; शस्त्र-नाणी व पुरातन खेळांचे प्रदर्शन
रायगड, 30 डिसेंबर, (हिं.स.)। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आणि नुकताच युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झालेला खांदेरी दुर्ग हा स्वराज्याच्या आरमारशक्तीचे प्रतीक मानला जातो. मात्र या दुर्गाचा इतिहास, त्यामागील पराक्रम आ
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आणि नुकताच युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झालेला खांदेरी दुर्ग हा स्वराज्याच्या आरमारशक्तीचे प्रतीक मानला जातो. मात्र या दुर्गाचा इतिहास, त्यामागील पराक्रम आणि स्वराज्यासाठी असलेले त्याचे धोरणात्मक महत्त्व आजही अनेकांना पुरेसे ज्ञात नाही. हाच इतिहास जनसामान्यांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने “खांदेरी दुर्ग ऐतिहासिक विजय दिन” मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.  ३१ डिसेंबर म्हटले की आज जगभरात, तसेच दुर्दैवाने आपल्या देशातही, केवळ वर्षअखेरीच्या जल्लोषाचेच वेध लागलेले दिसतात. मात्र इतिहासाच्या पानांत ३१ डिसेंबर १६७९ हा दिवस अत्यंत गौरवशाली मानला जातो. याच दिवशी स्वराज्याच्या आरमाराने खांदेरीवर विजय मिळवत मराठ्यांची सागरी ताकद संपूर्ण जगासमोर सिद्ध केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीने उभारलेले हे सागरी स्वप्न प्रत्यक्षात उतरल्याचा हा ऐतिहासिक क्षण होता.  या विजयाचे औचित्य साधून सोमवार, ३१ डिसेंबर २०२५ रोजी खांदेरी दुर्गासमोरील किनाऱ्यावरील खुबलढा बुरुज मच्छीमार सोसायटीजवळ, थळ बाजार जेट्टी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवव्याख्याते तसेच खांदेरी दुर्गावरील वाघबकरी या पुरातन बैठ्या खेळांचे संशोधक श्री. पंकजजी भोसले हे खांदेरीचा रोमहर्षक इतिहास उलगडून सांगणार आहेत.  याप्रसंगी शिवकालीन शस्त्रे, ऐतिहासिक नाणी तसेच पुरातन बैठ्या खेळांचे विशेष प्रदर्शनही मांडण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज श्री. रघुजीराजे आंग्रे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास सकाळी १० वाजता सुरुवात होणार आहे.  या ऐतिहासिक विजयाची महती प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन “आपला कट्टा संस्था”, “आम्ही स्वच्छंदी फाऊंडेशन”, “शिवशंभू विचार मंच कोकणप्रांत” आणि “सागरी सीमा मंच कोकणप्रांत” यांच्या वतीने करण्यात आले आहे.


रायगड, 30 डिसेंबर, (हिं.स.)। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आणि नुकताच युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झालेला खांदेरी दुर्ग हा स्वराज्याच्या आरमारशक्तीचे प्रतीक मानला जातो. मात्र या दुर्गाचा इतिहास, त्यामागील पराक्रम आणि स्वराज्यासाठी असलेले त्याचे धोरणात्मक महत्त्व आजही अनेकांना पुरेसे ज्ञात नाही. हाच इतिहास जनसामान्यांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने “खांदेरी दुर्ग ऐतिहासिक विजय दिन” मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.

३१ डिसेंबर म्हटले की आज जगभरात, तसेच दुर्दैवाने आपल्या देशातही, केवळ वर्षअखेरीच्या जल्लोषाचेच वेध लागलेले दिसतात. मात्र इतिहासाच्या पानांत ३१ डिसेंबर १६७९ हा दिवस अत्यंत गौरवशाली मानला जातो. याच दिवशी स्वराज्याच्या आरमाराने खांदेरीवर विजय मिळवत मराठ्यांची सागरी ताकद संपूर्ण जगासमोर सिद्ध केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीने उभारलेले हे सागरी स्वप्न प्रत्यक्षात उतरल्याचा हा ऐतिहासिक क्षण होता.

या विजयाचे औचित्य साधून सोमवार, ३१ डिसेंबर २०२५ रोजी खांदेरी दुर्गासमोरील किनाऱ्यावरील खुबलढा बुरुज मच्छीमार सोसायटीजवळ, थळ बाजार जेट्टी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवव्याख्याते तसेच खांदेरी दुर्गावरील वाघबकरी या पुरातन बैठ्या खेळांचे संशोधक श्री. पंकजजी भोसले हे खांदेरीचा रोमहर्षक इतिहास उलगडून सांगणार आहेत.

याप्रसंगी शिवकालीन शस्त्रे, ऐतिहासिक नाणी तसेच पुरातन बैठ्या खेळांचे विशेष प्रदर्शनही मांडण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज श्री. रघुजीराजे आंग्रे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास सकाळी १० वाजता सुरुवात होणार आहे.

या ऐतिहासिक विजयाची महती प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन “आपला कट्टा संस्था”, “आम्ही स्वच्छंदी फाऊंडेशन”, “शिवशंभू विचार मंच कोकणप्रांत” आणि “सागरी सीमा मंच कोकणप्रांत” यांच्या वतीने करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande