लातूर - भाजप स्वबळावर 70 जागा लढवणार – संभाजी पाटील निलंगेकर
लातूर, 30 डिसेंबर (हिं.स.)। लातूर महानगरपालिका निवडणुकीत भाजप सर्व 70 जागा स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा भाजप नेते संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली. दुपारी 3 वाजेपर्यंत भाजपाची उमेदवारांची यादी जाहीर होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. भाजप व राष्
लातूरमध्ये महायुती फिसकटली.. !! भाजप स्वबळावर 70 जागा लढवणार – संभाजी पाटील निलंगेकर


लातूर, 30 डिसेंबर (हिं.स.)। लातूर महानगरपालिका निवडणुकीत भाजप सर्व 70 जागा स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा भाजप नेते संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली. दुपारी 3 वाजेपर्यंत भाजपाची उमेदवारांची यादी जाहीर होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात होणारी युती अखेर तुटली असून, “राष्ट्रवादीत नव्याने आलेल्या काँग्रेसच्या B टीमने युतीत मिठाचा खडा टाकला” असा आरोप निलंगेकर यांनी केला. तसेच “राष्ट्रवादीने पक्षातील मिठाच्या खड्याचा शोध घ्यावा” असेही ते म्हणाले.

या घडामोडींमुळे लातूरमध्ये महायुती फिसकल्याचे स्पष्ट झाले असून, लातूर मनपा निवडणूक पूर्णपणे स्वबळावर लढण्याचा भाजपाचा निर्णय अंतिम झाल्याचे चित्र आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande